PM मोदी WAVES Summit 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत झालेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (WAVES 2025) या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात उपस्थित राहून भाषण केले. चार दिवसांच्या या भव्य समारंभात मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील जगभरातील मान्यवर एकत्र जमले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या समिटसाठी मुंबईत विशेष नियोजन आणि भव्य तयारी करण्यात आली आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज १०० हून अधिक देशांतील कलाकार, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते मुंबईत एकत्र आले आहेत. WAVES हे प्रत्येक कलाकार, निर्माता आणि तंत्रज्ञांसाठी एक जागतिक व्यासपीठ आहे. हे फक्त एक शॉर्टफॉर्म नाही, तर ही संस्कृती, सर्जनशीलता आणि सहकार्याची एक लाट आहे.”
पंतप्रधानांनी पुढे बोलताना सांगितले की, “या समारंभाचा उद्देश म्हणजे मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील सर्व घटकांना एकत्र आणणे. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळेल. मी देशातील मीडिया क्षेत्राला WAVES ला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. लवकरच ‘WAVES Awards’ ची घोषणा करण्यात येणार असून, हे पुरस्कार मीडिया जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार ठरतील.”