Home » अमर, अकबर आणि अँथनी येणार भेटीला – ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

अमर, अकबर आणि अँथनी येणार भेटीला – ‘ऑल इज वेल’ २७ जूनला चित्रपटगृहात

“तीन तिघाडा काम बिघाडा” ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. पण आता ‘तीन यार’ एकत्र आले की रंगत कशी जमून येते, हे प्रेक्षकांना दाखवायला येतोय ‘ऑल इज वेल’! प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर हे धमाल तिघे एकत्र येऊन मस्तीचा फुल ऑन तडका देणार आहेत. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘ऑल इज वेल’ हा सिनेमा २७ जून रोजी आपल्यासमोर येतोय.

या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केलं असून, कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत खुद्द प्रियदर्शन जाधव यांनीच. निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला असून, सहनिर्माते मल्लेश मरुचे आणि विनायक पट्टणशेट्टी आहेत.

प्रियदर्शन, अभिनय आणि रोहित ही भन्नाट त्रिकूट या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र येत आहे. त्यांच्या जोडीला सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी आणि दिशा काटकर यांसारखी दमदार स्टारकास्टही आहे.

All Is Well Marathi Movie

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात पोटासाठी आलेले अमर, अकबर आणि अँथनी – हे तिघं मित्र एका अनपेक्षित घटनेत अडकतात आणि त्यांच्या आयुष्याला एकदम कलाटणी मिळते. या धमाल प्रवासात त्यांची मैत्री कशी अधिक घट्ट होते, हे सगळं प्रेक्षकांना खळखळून हसवत सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक योगेश जाधव यांनी केलाय.

चित्रपटाच्या निर्मितीत अनेक कुशल तंत्रज्ञांचा सहभाग आहे. कार्यकारी निर्माते संजय ठुबे, संगीतकार चिनार-महेश आणि अर्जुन जन्या, छायाचित्रकार मयुरेश जोशी, संकलक अथश्री ठुबे, नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे, साहसदृश्यांचे दिग्दर्शन अजय ठाकूर पठाणिया, वेशभूषा कीर्ती जंगम आणि रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर यांची गीतं आणि रोहित राऊत, अपेक्षा दांडेकर यांच्या आवाजातली गाणी प्रेक्षकांना नक्कीच भावतील.

तर २७ जूनला, ‘ऑल इज वेल’ म्हणत, प्रियदर्शन, अभिनय आणि रोहितचं हे धमाल तिकडी तुमचं हसून हसून पोट दुखवायला येत आहेत – तयार आहात ना?

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy