Home » सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले यांचा ‘कापूसकोंडा’ २३ ऑक्टोबरला

सचिन पिळगावकर-मधुराणी गोखले यांचा ‘कापूसकोंडा’ २३ ऑक्टोबरला

माणूस आणि प्राणी यांच्यातील भावविश्व उलगडणाऱ्या या चित्रपटाची रक्षाबंधनाच्या निमित्ताने पहिली झलक प्रदर्शित; सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले पुन्हा एकत्र

‘कापूसकोंडा’ चित्रपटातील सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले

सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. दोघांची प्रमुख भूमिका असलेला ‘कापूसकोंडा’ हा मराठी चित्रपट येत्या २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आली.

‘कापूसकोंडा’ची कथा माणूस आणि प्राणी यांच्यातील नात्याभोवती गुंफण्यात आली आहे. कुटुंब, भावभावना आणि नात्यांमधील वेगवेगळे पदर या कथेतून समोर येणार आहेत. पहिल्या झलकमध्ये काही प्रसंग दाखवण्यात आले असून, त्यातून चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण होते.

झलकमध्ये मधुराणी गोखले यांच्यासोबत दोन मुली दिसतात. त्यानंतर एका खोलीत सचिन पिळगावकर मांडीवर कुत्र्याला घेऊन बसलेले दिसतात. या दृश्यांमधून ‘कापूसकोंडा’ नेमका कोण आहे आणि त्याच्याभोवतीची गोष्ट काय आहे, याची उत्सुकता निर्माण होते.

या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. यापूर्वी दोघांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. आता ‘कापूसकोंडा’मधून त्यांची जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

‘कापूसकोंडा’ची निर्मिती जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. यांनी केली आहे. पॅनोरामा स्टुडिओस प्रस्तुत व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज आणि स्टोरीवाला फिल्म या चित्रपटाला सादर करत आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारी सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाचे छायांकन सचिन पाटेकर यांनी केले आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी गाणी संगीतबद्ध केली असून अभिजीत हेगडेपाटील यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी ऐकायला मिळणार आहेत. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.

======

हे देखील वाचा : छाया कदम यांच्या अभिनयाची तापसी पन्नू फॅन; म्हणाली, ‘त्यांच्यासोबत काम करायचंच होतं

======

सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले यांच्यासोबत अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि भूषण पाटील हे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे मोठ्या प्रमाणातील चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी गावात करण्यात आले आहे.

माणूस आणि प्राणी यांच्यातील भावविश्व, कुटुंबातील नातेसंबंध आणि भावनिक गुंफण यांना वेगळ्या पद्धतीने मांडणारा ‘कापूसकोंडा’ आता २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

======

मसाला मनोरंजनवर मिळवा मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी आणि बातम्या. बॉलिवूड, मराठी, साऊथ, हॉलिवूड, टीव्ही आणि ओटीटीपासून बॉक्स ऑफिस रिपोर्ट, चित्रपटांचे रिव्ह्यू, सेलिब्रिटी स्पॉटिंग आणि खास मुलाखतींपर्यंत — मनोरंजनाच्या दुनियेतील सगळ्या अपडेट्स एका ठिकाणी.

Spread the love

You may also like

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy