Home » अशोक मा.मा. मालिकेत नवा धक्का! पोलिसांच्या अटकेला सामोरे जाणार मामा

अशोक मा.मा. मालिकेत नवा धक्का! पोलिसांच्या अटकेला सामोरे जाणार मामा

कलर्स मराठीवरील प्रेक्षकप्रिय मालिका अशोक मा.मा. मध्ये घरावर एकापाठोपाठ एक संकटं ओढावली आहेत. यावेळी मात्र परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून मामांना पोलिस अटकेला सामोरं जावं लागणार आहे.

संपूर्ण गोंधळाची सुरुवात झाली ती हॉस्पिटलच्या बिलापासून. अनिशने ते पैसे वेळेवर न भरल्याचं तुषारला समजताच त्याने थेट घरात धडक मारली. अखेर तुषार अनिशविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करतो. यावेळी अनिशला काही गुंतवणुकीचे पैसे मिळाल्याने तो आणखी अहंकारी होतो, आणि मामांचा त्याच्यावर संशय वाढतो. दोघांमध्ये जोरदार वाद होतो. या प्रकरणात अनिशला अटक होण्याची वेळ येते, पण नेहमीप्रमाणे मामाच पुढे येतात. सर्व आरोप स्वतःवर घेतल्याने पोलिस अखेर मामांना अटक करतात.

या घटनेमुळे घरात प्रचंड खळबळ उडते. पुढे हा गुंता कसा सुटणार, मामा निरपराध सुटतील का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, अनिश या सगळ्यामुळे अधिकच अस्वस्थ होतो. ऑफिसमध्ये खरा गुन्हेगार समोर येणार का? भैरवीला पुन्हा कामावर बोलावणार का? आणि ती नोकरी स्वीकारणार की बिझनेसवर लक्ष केंद्रीत करणार? हे पाहणंही तितकंच रोमांचक ठरणार आहे.

याच वेळी वर्षा वेणूकडे असलेली एक जुनी खंत दूर करण्याचा प्रयत्न करते. ती घर सोडताना एक पत्र आणि कॅश ठेवून जाते. त्या पत्रात ती कबूल करते की काही वर्षांपूर्वी उसने घेतलेले पैसे ती आता परत करत आहे. या प्रसंगानंतर भैरवी घराला आधार देण्याचा प्रयत्न करते, पण अनिश आत्मविश्वास गमावून बसतो आणि देवभक्तीत रमतो. त्याचा आणि भैरवीचा संबंध आणखी ताणला जातो.

पण या सगळ्यात अनिशच्या फसवणुकीचं गुपित उघड होणार का? भैरवीच्या बिझनेसवर त्याचा परिणाम होणार का? आणि घरावरचं संकट आणखी गडद होणार का?

हे जाणून घेण्यासाठी पाहा अशोक मा.मा. दररोज रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy