“मुलगी शिकली, प्रगती झाली…” हे वाक्य आपल्या जिभेवर किती सहज रुळलं आहे. पण अजूनही महाराष्ट्रात काही भाग असे आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचल्या नाहीत. मात्र अशा ठिकाणीही मुलींनी उच्च शिक्षणाची स्वप्नं उराशी बाळगलेली आहेत. ही स्वप्नं साकार करण्यासाठी गरज असते ती संधीची… आणि हीच संधी ‘कमळी’ने उपलब्ध करून दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील दुर्गम भागात शिक्षणासाठी रोज ८ ते १० किमी अंतर पार करणाऱ्या १०० शाळकरी मुलींना सायकल्स देण्याचा स्तुत्य उपक्रम ‘कमळी’ने हाती घेतला. या मुलींसाठी ST बस हे एकमेव वाहतुकीचं साधन, पण फेऱ्या कमी आणि अंतर जास्त. अशा परिस्थितीत सायकल म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या वाटेवरचा एक महत्त्वाचा आधारच ठरतो.
आपला अनुभव शेअर करताना विजया बाबर उर्फ कमळी म्हणाली,
“या मुलींच्या डोळ्यांत शिक्षणाचं स्वप्न पाहिलं, आणि त्या स्वप्नपूर्तीत आपला खारीचा वाटा असणं हे खूप समाधान देणारं आहे. सायकल ही फक्त एक वाहन नाही, ती त्यांच्या प्रवासाची नवी सुरुवात आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून माझे डोळे पाणावले. शिक्षणाकडे त्यांची वाट आता थोडी सोपी झाली आहे, आणि हीच खरी कमळीची भूमिका आहे.”
कमळीचा प्रवास केवळ मालिकेतच नव्हे तर वास्तवातही प्रेरणादायी ठरतो आहे. स्वतः शिक्षणाच्या जोरावर उभं राहिलेल्या कमळीने आता आपल्या गावातच एक महाविद्यालय सुरू करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. जिथे तिच्यासारख्या हजारो मुलींना शिकायची संधी मिळेल.
ही प्रेरणादायी गोष्ट अनुभवण्यासाठी पाहा ‘कमळी’ मालिकेचा प्रत्येक भाग, ३० जूनपासून दररोज रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!