Home » ‘गाडी नंबर १७६०’ : विनोदात गुंफलेली एक रहस्याची भन्नाट सफर!

‘गाडी नंबर १७६०’ : विनोदात गुंफलेली एक रहस्याची भन्नाट सफर!

GAADI NO 1760 TRAILER : मराठी सिनेमाच्या रंगमंचावर विनोद, रहस्य आणि थ्रिलर यांचं अनोखं मिश्रण घेऊन ‘गाडी नंबर १७६०’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तन्वी फिल्म्स प्रस्तुत आणि योगीराज संजय गायकवाड दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये जोरदार चर्चेचा विषय ठरतोय.

या ट्रेलरमध्ये एक काळी बॅग… ज्यात काहीतरी ‘खास’ लपलंय – आणि त्या बॅगेच्या मागे लागलेली वेगवेगळी पात्रं. ती बॅग कोणाची आहे? तिच्यात नक्की काय आहे? आणि या सगळ्याचा *‘गाडी नंबर १७६०’*शी काय संबंध? हे रहस्य प्रेक्षकांना ४ जुलै रोजी चित्रपटगृहात उलगडणार आहे.

जरी कथानक हलकं-फुलकं आणि विनोदी वाटत असलं तरी, त्यामागे खोल सामाजिक संदर्भ आहे. पैसा, लोभ आणि गोंधळलेली नैतिकता – या सगळ्याची गंमतीशीर मांडणी या सिनेमात करण्यात आली आहे.

दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड सांगतात, “ही केवळ एक थ्रिलर कथा नाही, तर ही मानवी लालसेवर भाष्य करणारी कथा आहे. प्रत्येक पात्र बॅगेच्या मागे का लागलं आहे, याची कारणं वेगवेगळी असली तरी त्यांचा शेवट एकाच ठिकाणी होतो – पैशावर. आम्ही या कथेला थोडं वेगळं वळण दिलं आहे, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.”

या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी म्हणतात, “तन्वी फिल्म्सचा प्रयत्न नेहमीच दर्जेदार आणि हटके सिनेमे देण्याचा असतो. ‘गाडी नंबर १७६०’ हा चित्रपट मनोरंजनाबरोबर विचार करायला लावणारा आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणं हीच याची खरी जमेची बाजू आहे.”

तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कैलाश सोराडी आणि विमला सोराडी यांनी केली असून, लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी योगीराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांच्यासारखे बहुआयामी कलाकार झळकणार आहेत.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy