‘द्विधा’मध्ये मानसी कुलकर्णीची लेक ओवीची एंट्री; मायलेकीची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

'द्विधा' चित्रपटातून मानसी कुलकर्णी आणि तिची लेक ओवी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर.

द्विधा‘ या आगामी मराठी चित्रपटामुळे अभिनेत्री मानसी कुलकर्णी आणि तिची लेक ओवी यांची जोडी सध्या चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मायलेकी पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार असून, ओवीचा हा पहिलाच अभिनयाचा अनुभव आहे. चित्रपट २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात मानसी कुलकर्णी ‘श्रावणी’ ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारत आहेत. विशेष म्हणजे, श्रावणीच्या बालपणीची भूमिका त्यांच्या लेक ओवीने साकारली आहे. पहिल्याच चित्रपटात ओवीने आत्मविश्वास आणि निरागसतेच्या जोरावर भूमिका साकारल्याचं चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे.

या अनुभवाबद्दल बोलताना मानसी कुलकर्णी म्हणाल्या, “श्रावणीच्या बालपणीच्या भूमिकेसाठी ओवीची निवड हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता. आई म्हणून तिचा पहिला ऑनस्क्रीन प्रवास पाहताना अभिमान वाटत होता. तिच्या अभिनयातील सहजता आणि आत्मविश्वास पाहून समाधान मिळालं. तिने ही भूमिका मनापासून आणि अत्यंत प्रामाणिकपणे साकारली आहे.”

ओवीनेही आपल्या पहिल्या अभिनय अनुभवाबद्दल भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. पण आई आणि संपूर्ण टीमने मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी ही भूमिका आत्मविश्वासाने करू शकले. ‘द्विधा’मधून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.”

‘द्विधा’ चे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती विदुला रमेश आजगावकर यांनी केली आहे.

हा चित्रपट केवळ बाप-लेकीच्या नात्यापुरता मर्यादित नसून, विविध नात्यांमधील प्रेम, विश्वास आणि भावनिक गुंतागुंत संवेदनशीलपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. चित्रपटात मानसी कुलकर्णी आणि ओवी यांच्यासोबत सतीश पुळेकर, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत आणि हेमांगी वेळणकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मायलेकीची ही अनोखी ऑनस्क्रीन जोडी आणि नात्यांवर आधारित भावनिक कथानक यामुळे द्विधाकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले असून, हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

=======

हे देखील वाचा : Samarth Teaser: रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित ‘समर्थ’चा टीझर प्रदर्शित

=======

Spread the love

Related posts

‘सायको रंगा’ टीझर प्रदर्शित; अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या रंगाच्या दमदार अ‍ॅक्शनची झलक

‘द्विधा’मधून निमिष कुलकर्णीचे मराठी चित्रपटात पदार्पण; २१ ऑगस्टला प्रदर्शित होणार भावनिक कथा

‘भूतम भयम्’साठी करण सोनावणेने शिकली मालवणी भाषा; भूमिकेसाठी घेतली विशेष मेहनत

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More