Samarth Teaser: रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित ‘समर्थ’चा टीझर प्रदर्शित

'समर्थ' चित्रपटाचा प्रेरणादायी टीझर प्रेक्षकांच्या भेटीला.

Samarth Teaser प्रेक्षकांच्या भेटीला आला असून समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना आधुनिक जीवनाशी जोडणारी कथा या आगामी मराठी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. अध्यात्म, कौटुंबिक नाती आणि दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष यांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

टीझरमध्ये एका सामान्य कुटुंबाची कथा उलगडताना दिसते. अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या वडिलांचा प्रवास आणि आधुनिक विचारसरणी असलेल्या मुलाची त्यावरील भूमिका यामुळे निर्माण झालेला संघर्ष कथानकाचा केंद्रबिंदू असल्याचे दिसून येते. समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीचा आजच्या काळातील जीवनमूल्यांशी असलेला संबंधही टीझरमध्ये प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या कुटुंबाच्या आयुष्यात समर्थांच्या विचारांमुळे कोणता बदल घडेल, वडील आणि मुलामधील दुरावा कमी होईल का आणि नात्यांना नवी दिशा मिळेल का, याची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणाले, “‘समर्थ’ हा चित्रपट आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे समर्थ रामदास स्वामींच्या विचारांतून शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक कुटुंबाला आपली वाटेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

निर्माते रविंद्र पाठक यांनी सांगितले, “‘समर्थ’ हा चित्रपट दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. अध्यात्म, नाती आणि जीवनमूल्यांचा समतोल साधणारी ही कथा प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देईल.” (Samarth Teaser)

थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ हा मराठी चित्रपट 14 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

=======

हे देखील वाचा : ‘खालिद के शिवाजी’ आता OTT वर; Apple TV, BookMyShow आणि YouTube Movies वर प्रदर्शित

=======

Spread the love

Related posts

‘खालिद के शिवाजी’ आता OTT वर; Apple TV, BookMyShow आणि YouTube Movies वर प्रदर्शित

MPSC च्या स्वप्नांपासून निसर्गरक्षणाच्या लढ्यापर्यंत… ‘आऊट ऑफ सिलॅबस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

शशांक शेंडेंचा रहस्यमय लूक व्हायरल; ‘घबाडकुंड’बद्दल वाढली उत्सुकता

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More