Border 2 रिलीजपूर्वी जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करणाऱ्या वरूण धवन ने आता एक खास किस्सा सांगितला आहे. चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर त्याला मिळालेल्या प्रेमाबरोबरच बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान यानेही त्याचे मनापासून कौतुक केल्याचं वरुणने उघड केलं.
सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन अभिनित Border 2 सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. काही आठवड्यांतच चित्रपटाने 400 कोटी रुपयांचा टप्पा पार करत मोठा विक्रम नोंदवला आहे. देशभक्ती आणि भावनिक प्रसंगांनी भरलेल्या या युद्धपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
रिलीजपूर्वी ट्रोलिंगचा सामना
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वरुण धवनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. ट्रेलरमधील त्याच्या एका स्माईलवरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली. काही जणांनी तर तो युद्धपटासाठी योग्य नाही, असंही म्हटलं होतं. त्याच्या अभिनयाबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या.
मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्र पूर्णपणे बदललं. प्रेक्षकांनी वरुणच्या अभिनयाचं कौतुक केलं आणि त्याच्या भूमिकेतील भावनिक व देशभक्तीपूर्ण बाजूला दाद दिली.
सलमान खानची खास प्रतिक्रिया
वरुणने सांगितलं की, चित्रपट रिलीज झाल्यानंतर सलमान खानने त्याला फोन करून म्हटलं, “I’m proud of you.” सलमानकडून मिळालेलं हे कौतुक त्याच्यासाठी खूप खास असल्याचं वरुणने नमूद केलं. ट्रोलिंगनंतर मिळालेलं हे प्रोत्साहन त्याच्यासाठी मोठी गोष्ट ठरली.
आज Border 2 केवळ कमाईतच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनातही आपली जागा निर्माण करत आहे. सुरुवातीच्या टीकेनंतरही मेहनतीच्या जोरावर वरुण धवनने स्वतःला सिद्ध केलं आहे, हेच या यशातून दिसून येतं.