‘भूतम भयम्’साठी करण सोनावणेने शिकली मालवणी भाषा; भूमिकेसाठी घेतली विशेष मेहनत

‘भूतम भयम्’मधील भूमिकेसाठी करण सोनावणेने मालवणी भाषा आत्मसात करण्यासाठी विशेष तयारी केली.

सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा करण सोनावणे आता ‘भूतम भयम्’ या आगामी मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात तो मालवणी तरुणाची भूमिका साकारत असून, ती पडद्यावर नैसर्गिक वाटावी यासाठी त्याने मालवणी भाषा शिकण्याची विशेष तयारी केली. (Karan Sonawane)

‘ऑरेंज ज्यूस गँग’मधून ओळख मिळवलेल्या करणने केवळ संवाद पाठ करण्यावर भर न देता मालवणी भाषेची लकब, उच्चार, शब्दफेक आणि बोलण्याची शैली समजून घेण्यासाठी सातत्याने सराव केला. त्यासाठी त्याने मालवणी मित्रांशी संवाद साधला, तसेच चित्रपटाच्या सेटवरील मालवणी सहकाऱ्यांकडूनही मार्गदर्शन घेतले.

प्रत्येक संवाद सहज आणि नैसर्गिक वाटावा यासाठी त्याने अनेक वेळा संवादांची उजळणी केली. भाषेतील बारकावे आत्मसात करण्यासाठी त्याने सातत्याने मेहनत घेतल्याचे सांगितले जाते.

या अनुभवाविषयी करण सोनावणे म्हणाला, “या चित्रपटात माझं पात्र मालवणी असल्याचं समजताच ही भाषा फक्त बोलायची नाही, तर ती जगायची आहे, असं मला वाटलं. सुरुवातीला उच्चार, शब्द आणि बोलण्याची लय समजून घेणं आव्हानात्मक होतं. काही शब्द वारंवार चुकायचे आणि मराठीची सवय मध्ये यायची. मात्र भूमिका कृत्रिम वाटू नये म्हणून मी मालवणी मित्रांशी सतत बोलत राहिलो. सेटवरील सहकाऱ्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं आणि संवाद अनेकदा म्हणत सराव केला. त्यामुळे हळूहळू भाषेची सहजता अंगी आली. आता पडद्यावर स्वतःला मालवणीत बोलताना पाहताना वेगळंच समाधान मिळत आहे. प्रेक्षकांनाही माझा हा प्रयत्न आवडेल, अशी आशा आहे. कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका काहीतरी नवीन शिकवते आणि ‘भूतम भयम्’मुळे मला मालवणी भाषेचं सौंदर्य जवळून अनुभवता आलं.” (Karan Sonawane)

‘भूतम भयम्’ हा चित्रपट झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले असून नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे हे निर्माते आहेत. बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.

या चित्रपटात सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर, करण सोनावणे, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘भूतम भयम्’ २४ जुलै रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

=======

हे देखील वाचा : Samarth Teaser: रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित ‘समर्थ’चा टीझर प्रदर्शित

=======

Spread the love

Related posts

Sammarth Trailer : दोन पिढ्यांतील संघर्ष आणि समर्थ विचारांची प्रेरणा; 14 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अमोल कागणे-शिवाजी लोटण पाटील यांचा नवा चित्रपट ‘मूर्ती’

फ्रेंडशिप डे निमित्त ‘मैत्रेया’ची घोषणा; क्रांती रेडकर वानखेडे पुन्हा दिग्दर्शनात

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More