Adinath Kothare Divorce: आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर यांचा 15 वर्षांनंतर घटस्फोट

आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी संयुक्त निवेदनाद्वारे विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला.

Adinath Kothare Divorce : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. दोघांनीही परस्पर संमतीने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सोशल मीडियावरील संयुक्त निवेदनातून दिली. जवळपास 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देत असतानाच मुलगी जिजाच्या संगोपनासाठी मात्र दोघेही सहपालक म्हणून एकत्र राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आदिनाथ कोठारे हे ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचे सुपुत्र आहेत. तर ऊर्मिला कानेटकर यांनी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले होते. अखेर त्यांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

मुलगी जिजासाठी सहपालक म्हणून राहणार एकत्र

संयुक्त निवेदनात आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी म्हटले आहे की, खूप विचारांती त्यांनी परस्पर संमतीने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुलगी जिजा ही त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची असून तिच्या आयुष्यात प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा कायम राहावा यासाठी दोघेही मिळून तिचे Co-parenting करणार आहेत.

त्यांनी पुढे असेही नमूद केले की, एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल त्यांच्या मनात कायम आदर राहील. आतापर्यंत चाहत्यांनी आणि माध्यमांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी आभार मानले असून, आयुष्याच्या या नव्या टप्प्यात त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंती केली आहे. या विषयावर हेच त्यांचे अंतिम अधिकृत वक्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

15 वर्षांच्या नात्याला पूर्णविराम

आदिनाथ आणि ऊर्मिला यांची ओळख मैत्रीतून झाली होती. पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये दोघांचा विवाह झाला. त्यानंतर 2017 मध्ये त्यांच्या घरी मुलगी जिजाचा जन्म झाला. विवाहानंतर हे जोडपे मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चेत आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. (Adinath Kothare Divorce)

घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर पडला पूर्णविराम

गेल्या काही काळापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र त्या चर्चांवर दोघांनीही कधीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अधिकृत निवेदनाद्वारे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर करताना, मुलीच्या संगोपनासाठी मात्र एकत्र जबाबदारी पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर मराठी मनोरंजन विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

=======

हे देखील वाचा : ‘खालिद के शिवाजी’ आता OTT वर; Apple TV, BookMyShow आणि YouTube Movies वर प्रदर्शित

=======

Spread the love

Related posts

‘लव्ह जिहाद’ आरोपांवर आमिर खानचं स्पष्ट उत्तर; “गौरी हिंदू नाही, कुणीही धर्मांतर केलं नाही”

स्वरा भास्करचा CJP आंदोलनाला पाठिंबा; जंतरमंतरवर सोनम वांगचुक यांची घेतली भेट

Vijaya Mehta : ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन; मराठी रंगभूमीला जागतिक ओळख मिळवून देणारा सुवर्ण अध्याय संपला

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More