Home » Dhurandhar 2 Teaser: रणवीर सिंहचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार; चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Dhurandhar 2 Teaser: रणवीर सिंहचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार; चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज!

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘धुरंधर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १९ मार्च रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

मंगळवारी निर्मात्यांनी या चित्रपटाचा छोटा टीझर रिलीज केला. यामध्ये रणवीर सिंह पुन्हा एकदा सूड घेण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. १ मिनिट १२ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये रणवीर ‘ल्यारी’ भागावर ताबा मिळवताना दिसतोय. कथेची लिंक लावण्यासाठी यामध्ये पहिल्या भागातील काही जुने सीन सुद्धा दाखवण्यात आले आहेत.

या व्हिडिओच्या शेवटी रणवीरचा एक डायलॉग आहे जो सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय, तो म्हणतो – “हा नवा भारत आहे, घरात घुसणार पण आणि मारणार पण!”

काय होती पहिल्या भागाची गोष्ट?

५ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या पहिल्या ‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर. माधवन सारखे मोठे कलाकार होते. ही कथा पाकिस्तानच्या ‘ल्यारी’ नावाच्या शहरावर आधारित आहे. यात रणवीर सिंहने हम्झा अली मजारी नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे, जो गुन्हेगारांच्या टोळीत सामील होतो.

पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. हा चित्रपट २०२५ मधील सर्वात हिट चित्रपट ठरला होता. आता दुसऱ्या भागात अक्षय खन्ना पुन्हा दिसण्याची शक्यता आहे.

बॉक्स ऑफिसवर होणार मोठी टक्कर

‘धुरंधर २’ १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार यश याचा ‘टॉक्सिक’ (Toxic) हा चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची लढत पाहायला मिळेल. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होईल.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy