Home » स्टार नाही, दिग्दर्शक नाही… फक्त एक तारीख! ‘अस्सी’च्या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ

स्टार नाही, दिग्दर्शक नाही… फक्त एक तारीख! ‘अस्सी’च्या पोस्टरने सोशल मीडियावर खळबळ

आज (मंगळवारी) जाहीर झालेल्या एका नव्या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरने बॉलिवूडप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘अस्सी’ या आगामी चित्रपटाची घोषणा करताना ना कोणताही स्टार, ना दिग्दर्शक, ना प्रॉडक्शन हाऊसचे नाव समोर आले आहे. फक्त लाल पार्श्वभूमी, पांढऱ्या अक्षरात चित्रपटाचे नाव आणि रिलीज डेट – एवढ्याच माहितीने हे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

साधारणपणे चित्रपटांच्या पोस्टरवर कलाकारांचे चेहरे, मोठी नावे आणि भव्य मांडणी असते. मात्र ‘अस्सी’च्या पोस्टरमध्ये अशी कोणतीही ओळख दिसत नाही. पोस्टरवर फक्त “Eighty. Per day. Everyday.” हे शब्द आणि चित्रपटाचे नाव आहे. ही वेगळी पद्धत मुद्दाम वापरली असावी, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाच्या मार्केटिंगमध्ये लेखकाला दिलेले महत्त्व विशेष लक्षवेधी ठरत आहे. पोस्टरवर नमूद करण्यात आले आहे की, “Believe it or not, the highest paid crew member on this film is the writer,” म्हणजेच या चित्रपटातील सर्वात जास्त मानधन लेखकाला देण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये क्वचितच लेखकांना इतके महत्त्व दिले जाते, त्यामुळे ही बाब चर्चेत आहे.

काही बॉलिवूड ट्रेड इनसाइडर्सनी हे पोस्टर शेअर करत लिहिले आहे, “Only if you knew what it was. Eighty times a day. Every day. Every twenty minutes. And when you do know, it hits hard. Very hard!!! ASSI, an urgent watch, in cinemas 20th February 2026.” ‘दिवसातून ऐंशी वेळा’ या वाक्यामुळे चित्रपटाचा विषय नेमका काय असावा, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

पोस्टरची साधी, थेट मांडणी आणि कोणतीही अतिरिक्त माहिती न देण्याचा निर्णय यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर एका युजरने प्रतिक्रिया देताना म्हटले, “ही उत्सुकता वाढवणारी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वाटते.” तर दुसऱ्याने लिहिले, “मोठे स्टार नाहीत, मोठा दिग्दर्शक नाही… मग इतकी गोपनीयता का?”

काही प्रेक्षकांनी मात्र या पद्धतीचे स्वागत केले आहे. एका पोस्टमध्ये म्हटले आहे, “कधीतरी स्टारचे चेहरे नसलेलं पोस्टर पाहून बरं वाटतं. कदाचित हा कंटेंटवर आधारित सिनेमा असेल.” हे मत आजच्या प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीचे द्योतक मानले जात आहे.

सध्या ‘अस्सी’च्या कलाकारांबाबत आणि टीमबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. ‘अस्सी’ हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्याच दिवशी सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर अभिनीत ‘दो दीवाने शहर में’ हा रोमँटिक ड्रामा देखील रिलीज होणार आहे.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy