कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आज प्रसारित होणाऱ्या ‘भाऊचा धक्का’ या खास भागात शोचे सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी घरातील सर्वात लाडके आणि प्रभावी सदस्य प्रभु शेळकेच्या खेळाचं तोंडभरून कौतुक केलं.
साधा, सरळ आणि विनोदी स्वभाव असलेल्या प्रभु शेळकेने आपल्या अनोख्या स्टाईलने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. त्याच्या एंटरटेनमेंट व्हॅल्यूवर बोलताना रितेश देशमुख म्हणाले,
“प्रभु, बाहेरच्या दुनियेत तुम्ही एका कॅमेराने कंटेंट तयार करता, पण इथे तब्बल १०० कॅमेरे आहेत. तुम्ही लोकांना हसवलंत, रडवलंत. मी बाकी सगळ्यांना सांगू इच्छितो – तुम्ही यांना कमी लेखत आहात, पण या आठवड्याचे हे खरे एंटरटेनमेंटचे ‘डॉन’ आहेत!”
रितेश भाऊंच्या या शब्दांनी प्रभु शेळके भावूक झाला आणि त्याने नम्रपणे सर्वांचे आभार मानले. घरात तो शांत आणि संयमी वाटत असला, तरी या ‘डॉन’ अवतारानंतर आता घरातील समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
=====
हे देखील वाचा : २४व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या ‘मराठी सिनेमा कॉम्पिटिशन’मध्ये ‘तिघी’ची अधिकृत निवड
=====