फिटनेस आणि ॲक्शनची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ आता आयुर्वेदिक ब्रँड Kapivaसोबत जोडला गेला आहे. कंपनीने आपल्या Kapiva Shilajit Gold Resin उत्पादनासाठी सुरू केलेल्या ‘Build Naturally’ मोहिमेचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून टायगरची घोषणा केली आहे.
नैसर्गिक घटकांच्या आधारे ताकद, ऊर्जा आणि फिटनेस वाढवण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे. टायगरची फिटनेसप्रेमी प्रतिमा लक्षात घेऊन कंपनीने त्याची या मोहिमेसाठी निवड केली आहे. (Tiger Shroff Kapiva Shilajit)
नवीन जाहिरातीत टायगर श्रॉफ एका डॉक्टरांसोबत दिसतो. या संवादातून नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी प्रथिनांचे शोषण, टेस्टोस्टेरॉनची भूमिका आणि त्याचा शरीराच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम सोप्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आला आहे.
या भागीदारीबद्दल टायगर श्रॉफ म्हणाला, “माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की शक्ती आणि तंदुरुस्ती योग्य मार्गाने आणि शक्य तितक्या नैसर्गिकरित्या कमावली पाहिजे. ‘कपिवा शिलाजीत गोल्ड’ची मला हीच गोष्ट आवडते: यात शिलाजीतसारख्या पारंपरिक घटकाला संशोधनाची जोड दिली आहे. माझ्यासाठी, नैसर्गिकरित्या तुमची शक्ती, ऊर्जा आणि कामगिरी (performance) वाढवण्याला महत्त्व आहे आणि हीच गोष्ट मला मनापासून भावते.”
दरम्यान, टायगर श्रॉफकडे चित्रपटांच्या आघाडीवरही मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच ‘वज्र’ या ॲक्शनपटात झळकणार असून दिग्दर्शक सचिन रवी यांच्या आणखी एका हाय-ऑक्टेन ॲक्शन चित्रपटातही तो प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
ब्रँड एंडोर्समेंट आणि आगामी चित्रपट अशा दोन्ही आघाड्यांवर टायगर श्रॉफ सध्या सक्रिय असून, फिटनेस आणि ॲक्शन या दोन्ही क्षेत्रांतील त्याची ओळख अधिक मजबूत करण्याच्या दिशेने ही नवी भागीदारी महत्त्वाची मानली जात आहे. (Tiger Shroff Kapiva Shilajit)
========
हे देखील वाचा : इंडिया कूचर वीक 2026 मध्ये Bergner Indiaचा अनोखा ठसा; Arpita Mehta सोबत फॅशन आणि किचनचा संगम
========