Home » ‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

‘अवकारीका’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

“कथा त्यांच्या आत्मसन्मानाची, कथा आपल्या आत्मभानाची, स्वच्छ, देखण्या, निरोगी भारताची, पृथ्वी लख्ख करणाऱ्या दूतांची…”

या टॅगलाईनसह येणाऱ्या ‘अवकारीका’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण झाले आहे. पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसते. रेडबड मोशन पिक्चरच्या बॅनरअंतर्गत येत्या १३ जूनला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद भोसले यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, आणि गीता सिंग यांची आहे.

स्वच्छतेच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्याचा मार्ग शोधणाऱ्या वेदनेचा शोध असला, तरी समाजाला त्यांच्या श्रमांची जाणीव करून देण्याच्या आणि स्वच्छतेची प्रभावी जागरूकता निर्माण करण्याच्या भावनेतून ‘अवकारीका’ प्रेक्षकांसमोर येत आहे.

या चित्रपटात अभिनेता विराट मडके स्वच्छता दूताच्या भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत राहुल फलटणकर, रोहित पवार, विनोद खुरंगळे, पिया कोसुम्बकर, नितीन लोंढे, प्रफुल्ल कांबळे, स्नेहा बालपांडे तसेच बालकलाकार वैभवी कुटे, उन्नती माने, कार्तिकी बट्टे यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते अरविंद भोसले यांनी लिहिली आहेत. छायांकन करण तांदळे यांनी केले असून संकलन अथर्व मुळे यांचे आहे. सहदिग्दर्शक रेहमान पठाण आणि कार्यकारी निर्माता चेतन परदेशी आहेत. चित्रपटाचे संगीत श्रेयस देशपांडे यांनी दिले असून, कैलाश खेर, सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या स्वरांनी चित्रपटातील गीते सजली आहेत.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy