मराठी लघुपट–माहितीपटांचा विशेष महोत्सव; 19 निवडक कलाकृतींनी रंगणार मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीतर्फे मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, 16 जून 2026 रोजी मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील लघु नाट्यगृहात पार पडले.

या उद्घाटन सोहळ्याला व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष महत्त्व लाभले. तसेच सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांचीही उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कथाकथनाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम रसिकांसाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक टप्पा ठरतो आहे.

दि. 16 ते 20 जून 2026 या कालावधीत हा महोत्सव दररोज सायंकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांसाठी खुला राहणार आहे. या माध्यमातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवलेल्या, तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विषयांना स्पर्श करणाऱ्या मराठी लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन केले जात आहे. चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक आणि नवोदित निर्मात्यांसाठी ही एक प्रेरणादायी संधी मानली जात आहे.

पहिल्या दिवशी “मायबाचे आशीर्वाद”, “मेतकूट”, “नेहमीच” हे लघुपट तसेच “फड” हा माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कलाकृतींनी सामाजिक आशय आणि संवेदनशील विषयांची मांडणी प्रभावीपणे केली.

प्रदर्शन वेळापत्रक

17 जून 2026 (सायं. 6.30)

  • वेणी (लघुपट)
  • जास्वंद (लघुपट)
  • पॅम्पलेट (लघुपट)
  • महाल्ले (माहितीपट)
  • अर्जुन (लघुपट)

18 जून 2026 (सायं. 6.30)

  • ब्रह्मकमळ (लघुपट)
  • गढूळ (लघुपट)
  • डीयर 202 (लघुपट)
  • 17 वे वर्ष (लघुपट)
  • फड (माहितीपट)

19 जून 2026 (सायं. 4 ते 6)

  • पाणखोल (लघुपट)
  • अर्जुन (लघुपट)
  • डोंगर पाणी (लघुपट)
  • दारवठा (लघुपट)

20 जून 2026 (सायं. 6.30)

  • वाघ (लघुपट)
  • सापशिडी (लघुपट)
  • मुक्ता (लघुपट)
  • दारवठा (लघुपट)

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा हा उपक्रम मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या प्रतिभेला व्यासपीठ देण्याबरोबरच प्रेक्षकांना दर्जेदार आणि विचारप्रवर्तक कलाकृतींचा अनुभव देतो आहे. मुंबईत सुरू असलेला हा महोत्सव चित्रपट रसिकांसाठी खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक मेजवानी ठरत आहे.

Spread the love

Related posts

MIFF 2026 : लघुपट हे नवोदितांसाठी प्रभावी व्यासपीठ; नीना कुलकर्णींचे मत

आशियाई सिनेमाची नवी लाट: MIFF 2026 मधील Busan Next Wave विभाग ठरला खास

मुलांसाठी सिनेमा हा बदलाचा आवाज: MIFF 2026 मध्ये मान्यवरांचे मत

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More