Home » बॉलिवूडचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

बॉलिवूडचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

Bollywood Legend Manoj Kumar Passes Away at 87 – प्रख्यात बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत होती, आणि अखेर 4 एप्रिल 2025 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी ब्रिटिश भारतातील (आताच्या पाकिस्तानातील) अबोटाबाद येथे हरिकृष्ण गिरी गोस्वामी या नावाने झाला. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी हिंदू कॉलेजमधून कला शाखेतील पदवी प्राप्त केली.

देशभक्तीचा अनोखा जाजवा: ‘भारत कुमार’ची ओळख

मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपट केले, ज्यामुळे त्यांना ही उपाधी मिळाली. त्यांच्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने भारतीय प्रेक्षकांवर गारूड घातले.

चित्रपटसृष्टीतली कारकीर्द आणि गाजलेले चित्रपट

1957 साली ‘फॅशन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मनोज कुमार यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांचे काही अविस्मरणीय चित्रपट

‘वह कौन थी’ ‘पूरब और पश्चिम’ ‘शोर’ ‘हरियाली और रास्ता’ ‘गुमनाम’ ‘शहीद’ (भगतसिंहांच्या भूमिकेतील त्यांचा अभिनय तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीं यांनीही गौरवला होता.) ‘पत्थर के सनम’ ‘सावन की घटा’ ‘क्रांति’

मनोज कुमार यांना मिळालेले सन्मान

1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार

त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा देशभक्तीचा वारसा आणि सिनेमातील योगदान कायम स्मरणात राहील.

मसाला मनोरंजन कडून मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy