Home » आयपीलमध्ये मराठमोळा ट्विस्ट: अमेय वाघ आणि चितळे यांची भन्नाट जोडी

आयपीलमध्ये मराठमोळा ट्विस्ट: अमेय वाघ आणि चितळे यांची भन्नाट जोडी

क्रिकेट आणि चितळे बाकरवडी – परफेक्ट जोडी!

चितळे बंधूंची जगप्रसिद्ध, तोंडात टाकताच आनंद देणारी बाकरवडी आता ‘मिनी’ स्वरूपात आलीये! ७५ वर्षांपासून आपल्या खमंग चवीनं ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या या बाकरवडीचं हे नवं रूप, म्हणजे खरं तर छोट्या पॅकमध्ये मोठा धमाका!

आयपीएलच्या हंगामात ‘मिनी’चा मास्टरस्ट्रोक!

सध्या आयपीएलचं फिव्हर सगळीकडे पसरलेलं असताना, चितळे बंधूंनी अगदी योग्य वेळ साधून ही मिनी बाकरवडी बाजारात आणलीये. आणि मज्जेची गोष्ट म्हणजे – या नव्या बाकरवडीसाठी आम्ही अमेय वाघ आणि आयुष मेहरासोबत मिळून तीन भन्नाट जाहिराती केल्या आहेत. क्रिकेट आणि बाकरवडी यांचा परफेक्ट कॉम्बो दाखवणाऱ्या या जाहिरातींचा टॅगलाईन – ‘Get Match Ready with Chitale Bakarwadi’ – म्हणजे आयपीएल मॅचची तयारी, बाकरवडीशिवाय अधुरीच!

Chitale Bandhu Mini Bakarwadi

क्रिकेट रसिकांच्या हृदयात मिनी बाकरवडी!

या नव्या बाकरवडीबद्दल चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे म्हणतात, “क्रिकेट चाहते संघांमध्ये विभागले गेले असले, तरी चव ही गोष्ट सगळ्यांना एकत्र आणते. ही मिनी बाकरवडी आता त्यांचं सामायिक खूशीनं भरलेलं क्षण बनवणार आहे.”

चितळेंचा संकल्प – देशभरात पोहोचायचं!

चितळे बंधूंचे भागीदार केदार चितळे यांचंही असंच म्हणणं – “आयपीएलचा हंगाम आणि ही नवीन जाहिरात मोहीम, यामुळे आम्ही भारतभरात नवीन बाजारपेठा शोधण्यास तयार आहोत. मिनी बाकरवडी हे त्यासाठी एक उत्तम पाऊल ठरेल.”

७५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना, चितळे बंधू आता मुंबई इंडियन्स संघाचे अधिकृत स्नॅकिंग पार्टनरसुद्धा आहेत. आणि आता ही ‘मिनी’ बाकरवडी – क्रिकेट आणि चव यांना एकत्र आणणारा एक भन्नाट अनुभव ठरतोय!

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy