Home » मनवा-श्लोकच्या नात्याची झलक, प्रेक्षकांना भुरळ घालणारा टीझर प्रदर्शित!

मनवा-श्लोकच्या नात्याची झलक, प्रेक्षकांना भुरळ घालणारा टीझर प्रदर्शित!

‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा धमाल टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलाच उधाण आणले आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर रिलीज झाले होते, त्यानंतरपासूनच चित्रपटाबद्दलची चर्चा रंगू लागली होती. आता या भन्नाट टीझरमुळे चित्रपटाची प्रतीक्षा आणखी रंगतदार झाली आहे.

टीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती आणि त्यांचे दृष्टिकोन खूपच छानपणे उलगडले आहेत. मनवा – एक बिनधास्त, धाडसी मुलगी आणि श्लोक – शांत, समंजस मुलगा, या दोन पात्रांची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळतो. त्यांच्यातील संवाद चित्रपटाबद्दलची उत्कंठा दुप्पट करतात. दोन वेगवेगळ्या स्वभावांचे लोक जेव्हा प्रेमाच्या प्रवासाला निघतात, तेव्हा काय घडतं, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांची दमदार उपस्थिती आहे.

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणाल्या, “हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. मनवा आणि श्लोकची ही सफर प्रेक्षकांच्या मनाला भिडेल, यात मला शंका नाही.”

प्रस्तुतकर्ते नितीन वैद्य यांनी सांगितले, “ही कथा प्रेक्षकांना आपल्या घरच्यांसारखी जवळची वाटेल. एक वेगळा आणि कौटुंबिक अनुभव देणारा हा चित्रपट आहे.”

निर्माते संजय दावरा यांचं म्हणणं आहे, “या चित्रपटात कथा, कलाकार आणि दिग्दर्शन या सगळ्याच बाबी उत्तमरीत्या एकत्र आल्या आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल.”

‘मना’चे श्लोक’ १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून, लेखन-दिग्दर्शनाची जबाबदारी मृण्मयी देशपांडे यांनी सांभाळली आहे. निर्मिती श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांची असून, स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy