‘रावण तांडव’साठी ए. आर. रहमान यांची विशेष मेहनत; संगीताचे तयार केले १२-१३ व्हर्जन

भारतीय संगीतविश्वातील दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान सध्या दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘रामायण’ चित्रपटाच्या संगीतावर विशेष लक्ष केंद्रित करत केल होत. या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल १० ते १२ अन्य प्रोजेक्ट्स नाकारल्याचा खुलासा केला आहे. गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2026) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा अनुभव सांगितला.

‘रामायण’ या प्रोजेक्टशी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ जोडले गेल्याचे रहमान यांनी सांगितले. या चित्रपटासाठी पूर्ण वेळ देता यावा, यासाठी त्यांनी इतर कामांना बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला. या भव्य प्रोजेक्टचा भाग होता आले, याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘रावण तांडव’च्या संगीतासाठी १२-१३ व्हर्जन्स

‘रामायण’च्या संगीतनिर्मितीमागे किती मेहनत घेतली जात आहे, याची झलकही रहमान यांनी दिली. काही संगीत रचनांचे तब्बल १२ ते १३ वेगवेगळे व्हर्जन्स तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी त्यांनी ‘रावण तांडव’ या रचनेचे उदाहरण दिले. वेगवेगळ्या भाषांमध्ये या संगीतावर काम करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक आवृत्ती काळजीपूर्वक तयार करावी लागली. हा संपूर्ण अनुभव खूप सुंदर असल्याचे रहमान यांनी सांगितले.

‘रामायण’साठी इतर प्रोजेक्ट्सना नकार

पत्रकार परिषदेत बोलताना रहमान म्हणाले की, ‘रामायण’वर काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे अनेक निर्मात्यांना त्यांनी नकार कळवला. इतर प्रोजेक्ट्सपेक्षा या चित्रपटाच्या संगीताला त्यांनी प्राधान्य दिले.

त्यांच्या मते, गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाच्या संगीतावर काम सुरू असून, या प्रवासात त्यांना आणि त्यांच्या टीमला खूप काही शिकायला मिळाले. या चित्रपटाशी जोडले जाणे हा त्यांच्यासाठी अभिमानाचा विषय आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेतदिसले आहेत.

‘रामायण’ दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.  

Spread the love

Related posts

IFFI 2026 मध्ये ‘तिघी’ आणि ‘सिनेमॅन’ची निवड; गोव्यात होणार दोन्ही मराठी चित्रपटांचं प्रदर्शन

गोव्यात फिल्म सिटी उभारण्याचा विचार; चित्रपट निर्मितीचं केंद्र बनवण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

IFFI च्या प्रत्येक दिवसाचा खास रिपोर्ट; आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते IFFILOID लाँच

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More