‘घबाडकुंड’च्या यशानंतर प्रीतम एस. के. पाटील ठरले मराठी हॉरर सिनेमाचा नवा चेहरा

'घबाडकुंड' आणि 'अल्याड पल्याड'च्या यशानंतर प्रीतम एस. के. पाटील यांची मराठी हॉरर चित्रपटसृष्टीतील वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आशय, तंत्रज्ञान आणि वेगळ्या विषयांच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव वेगाने पुढे येत आहे. ‘अल्याड पल्याड’नंतर त्यांच्या ‘घबाडकुंड’ या चित्रपटालाही प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांनी सलग दोन यशस्वी हॉरर चित्रपटांची नोंद आपल्या नावावर केली आहे.

विदर्भातील यवतमाळ येथून आलेल्या प्रीतम एस. के. पाटील यांनी शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीजमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ आणि ‘ढिशक्यांव’ या चित्रपटांमधून त्यांनी दिग्दर्शनाची छाप पाडली. मात्र ‘अल्याड पल्याड’ आणि आता ‘घबाडकुंड’च्या यशामुळे मराठी हॉरर शैलीतील आश्वासक दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख अधिक भक्कम झाली आहे.

‘घबाडकुंड’ची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीला सिनेमॅटिक युनिव्हर्सची संकल्पना अनुभवायला मिळाली. भय, रहस्य, अॅक्शन, भावनिक प्रसंग आणि थरार यांचा समतोल साधणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे.

या चित्रपटाचे निर्माते डॉ. रसिक कदम (आयकॉन द स्टाईल) यांनी प्रीतम एस. के. पाटील यांच्या दिग्दर्शनावर विश्वास व्यक्त करत त्यांना सातत्याने पाठबळ दिले. त्यांच्या सहकार्यामुळे ‘घबाडकुंड’सारखा तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि मोठ्या कॅनव्हासवर साकारलेला चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणे शक्य झाल्याचे मानले जाते.

चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना प्रीतम एस. के. पाटील म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’वर जसं प्रेम केलं, तसंच भरभरून प्रेम ‘घबाडकुंड’लाही मिळत आहे. हा प्रतिसाद आमची जबाबदारी आणखी वाढवणारा आहे. मराठी प्रेक्षकांना दर्जेदार हॉरर अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न पुढेही कायम राहील. प्रेक्षकांचा विश्वास असल्यामुळेच आम्ही आणखी मोठ्या कथा आणि सिनेमॅटिक युनिव्हर्स विस्तारण्याचं धाडस करू शकतो.”

सलग दोन यशस्वी चित्रपटांमुळे प्रीतम एस. के. पाटील यांच्याकडून मराठी हॉरर सिनेमाला आणखी नवे प्रयोग आणि मोठ्या कॅनव्हासवरील कथा पाहायला मिळतील, अशी अपेक्षा चित्रपटप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. विदर्भातून आलेल्या या युवा दिग्दर्शकाने आपल्या कामाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची दिशा निश्चित केल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

=======

हे देखील वाचा : Samarth Teaser: रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित ‘समर्थ’चा टीझर प्रदर्शित

=======

Spread the love

Related posts

Paresh Rawal On OMG 2: ‘अक्षय कुमारमुळे नाही, बदललेल्या स्क्रिप्टमुळे चित्रपट सोडला’; क्रेडिट न मिळाल्याची खंत व्यक्त

Adinath Kothare Divorce: आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर यांचा 15 वर्षांनंतर घटस्फोट

‘लव्ह जिहाद’ आरोपांवर आमिर खानचं स्पष्ट उत्तर; “गौरी हिंदू नाही, कुणीही धर्मांतर केलं नाही”

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More