Musafir Cafe Trailer: विक्रांत मेस्सीच्या रोमँटिक ड्रामाचा ट्रेलर प्रदर्शित, 24 जुलैला Netflix वर रिलीज

'Musafir Cafe'चा ट्रेलर प्रेम आणि आयुष्यातील बदलत्या नात्यांचा वेगळा प्रवास दाखवतो.

Musafir Cafe Trailer प्रदर्शित झाला असून नेटफ्लिक्सच्या आगामी रोमँटिक ड्रामाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. विक्रांत मेस्सी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि आयुष्यातील बदलत्या टप्प्यांवर भाष्य करतो. हा चित्रपट 24 जुलैपासून Netflix वर स्ट्रीम होणार आहे.

ट्रेलरची सुरुवात एका विचार करायला लावणाऱ्या संवादाने होते. “Kahan likha hai ki life ke different phases mein do alag logon se pyaar nahi ho sakta?” या प्रश्नातूनच चित्रपटाचा मुख्य गाभा स्पष्ट होतो. पारंपरिक प्रेमकथांपेक्षा वेगळा दृष्टिकोन स्वीकारत ही कथा आयुष्यातील प्रत्येक नातं व्यक्तीला कसं घडवतं, याचा शोध घेते.

चित्रपटात विक्रांत मेस्सीने चंदर मोहन शर्मा ही भूमिका साकारली आहे. स्वतःच्या आयुष्याचं प्रत्येक पाऊल आधीच ठरवून चालणाऱ्या चंदरच्या आयुष्यात सुधाची एंट्री होते. वेदिका पिंटोने साकारलेली सुधा ही स्वतंत्र विचारांची घटस्फोट प्रकरणे हाताळणारी वकील असून ती चंदरला अनिश्चिततेलाही स्वीकारण्याची आणि मोठी स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देते.

कथेला पुढे वेगळं वळण मिळतं, जेव्हा चंदरच्या आयुष्यात प्रीती येते. महिमा मकवानाने साकारलेल्या या व्यक्तिरेखेच्या शांत स्वभावातून आणि निस्वार्थ साथीतून चंदरला नात्यांचा आणखी एक पैलू अनुभवायला मिळतो. या दोन वेगवेगळ्या नात्यांमधून त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत जातो. (Musafir Cafe Trailer)

Musafir Cafe Trailer मध्ये प्रेम, विरह, करिअरची स्वप्नं आणि स्वतःचा शोध अशा अनेक भावनिक छटा पाहायला मिळतात. प्रत्येक नातं कायम टिकावं असं नसतं, पण ते व्यक्तीला आयुष्यभरासाठी काहीतरी शिकवून जातं, हा संदेश चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

‘Musafir Cafe’ची संकल्पना आणि लेखन शरण्या राजगोपाल यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा रुचिर अरुण यांनी सांभाळली आहे. Terribly Tiny Tales आणि Homemade Stories यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मोठ्या रोमँटिक प्रसंगांपेक्षा मानवी भावना, बदलणारे नातेसंबंध आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रवास यावर भर देणारा ‘Musafir Cafe’ हा चित्रपट 24 जुलैपासून Netflix वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाकडे नव्या दृष्टीने पाहणारी ही कथा प्रेक्षकांना भावनिक प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे.

=======

हे देखील वाचा : Alia Bhatt Tumbbad 2: आलिया भट्टची ‘तुंबाड 2’मध्ये अधिकृत एंट्री. सोहम शाहने घोषणा केली.

=======

Spread the love

Related posts

ग्रामीण भारतातील राजकारणाचा थरार उलगडणाऱ्या ५ दमदार हिंदी वेब सिरीज

नव्या शहरात, नव्या केसचा शोध; ‘कोहरा’ सिझन 2 ची दमदार सुरुवात

आई-वडील होण्याआधीचा गोंधळ दाखवणारी ‘बे दुणे तीन’

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More