कान्स चित्रपट महोत्सव सुरू झाल्यापासून तिथे उपस्थित झालेल्या अभिनेत्रींच्या लूक्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. अभिनेत्री छाया कदम सलग दुसऱ्या वर्षी कान्समध्ये हजेरी लावत आहे.तिच्या वेगळ्या लूक्सची नक्कीच इंडस्ट्रीमध्ये चांगलीच चर्चा झाली आहे.

छाया कदम ‘लापता लेडीज’, ‘सैराट’ आणि ‘झुंड’ या चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. छाया कदम च्या या हटके लूक्सची इंडस्ट्रीत चर्चा झाली.




कान्स फिल्म फेस्टिव्हल १३ मे रोजी सुरू झाला आहे. हा ७८ वा चित्रपट महोत्सव आहे, ज्यामध्ये जगभरातील नामांकित कलाकार सहभागी होत आहेत. हा चित्रपट महोत्सव २४ मे रोजी संपेल.