Home » आशा भोसले यांची संपत्ती किती? गायनासोबत ‘Asha’s’ रेस्टॉरंटमधूनही केली कोट्यवधींची कमाई

आशा भोसले यांची संपत्ती किती? गायनासोबत ‘Asha’s’ रेस्टॉरंटमधूनही केली कोट्यवधींची कमाई

दिग्गज गायिका आशा भोसले आता आपल्यात नाहीत. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुरांच्या दुनियेत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ‘आशाताई’ंच्या जाण्याने संगीतविश्वावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. मात्र, केवळ संगीताची परंपरा नाही, तर कोट्यवधींची संपत्तीही त्या मागे ठेवून गेल्या आहेत.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली जिल्ह्यातील गोर गावात झाला. अगदी लहान वयात, १९४३ साली त्यांनी गायन कारकिर्दीची सुरुवात केली. पुढील आठ दशकांहून अधिक काळ त्यांनी तब्बल १२ हजारांपेक्षा जास्त गाणी गाऊन एक विक्रमच केला.


Asha’s Restaurant

रिपोर्टनुसार, त्यांच्या एकूण संपत्तीचा अंदाज सुमारे ८० ते १०० कोटी रुपयांच्या दरम्यान होता. त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायिकांमध्ये त्यांची गणना होत असे.

मुंबईसह इतर शहरांमध्ये आणि पुण्यात त्यांची आलिशान घरे होती. साऊथ मुंबईतील ‘प्रभाकुंज’ अपार्टमेंटमधील त्यांचे निवासस्थान विशेष चर्चेत असायचे. काही रिपोर्ट्सनुसार, त्यांनी गेल्या वर्षी पुण्यातील एक अपार्टमेंट सुमारे ६ कोटी रुपयांना विकले होते.

पण आशाताईंची कमाई फक्त गाण्यांपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी व्यवसाय क्षेत्रातही आपली छाप उमटवली.

२००२ साली त्यांनी दुबईतील वाफी मॉलमध्ये ‘Asha’s’ नावाने भारतीय रेस्टॉरंट सुरू केलं. त्यांच्या नावावर सुरू झालेल्या या रेस्टॉरंटला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सातत्याने वाढवला.

आज ‘Asha’s’ ही रेस्टॉरंट चेन जगभरात पसरलेली आहे. दुबई, कुवैत, दोहा, कतार, बहरीन, अबूधाबी यांसारख्या मिडल ईस्ट देशांमध्येच नव्हे, तर लंडन, मॅंचेस्टर आणि बर्मिंगहॅममध्येही या रेस्टॉरंट्सने आपली ओळख निर्माण केली आहे.

गायन आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात यश मिळवत आशा भोसले यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यांच्या आवाजासोबतच त्यांची ही यशोगाथाही कायम लक्षात राहील.

=====

हे देखील वाचा : वयाच्या 80 व्या वर्षी आशा भोसले यांचं अभिनयात पदार्पण, ‘माई’ मधील भूमिका ठरली होती खास

=====

Spread the love

You may also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy