बॉलिवूडमध्ये आपल्या वेगळ्या भूमिकांनी आणि दमदार अभिनयाने स्वतःचं ठसा उमटवणारी सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आहे. सातत्य, वेगळेपण आणि दमदार भूमिकांच्या निवडीमुळे सईनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
बॉलिवूडमध्ये बॅक-टू-बॅक दमदार एन्ट्री!
सईने नुकतीच द सीक्रेट ऑफ शिलेदार्स या वेबसिरीज मधून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाच्या यशानंतर ती आणखी एका दमदार बॉलिवूड प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेची निवड आणि ती साकारण्याची शैली नेहमीच प्रेक्षकांना आकर्षित करत असते.
डब्बा कार्टेल – वेबसीरिजसाठी उत्सुकता शिगेला!
येत्या काही दिवसांत सईची बहुचर्चित वेबसीरिज डब्बा कार्टेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या वेबसीरिजमध्ये टिफिन सर्व्हिस चालवणाऱ्या साध्या महिलांची गोष्ट आहे, पण या साध्या भासणाऱ्या महिलांच्या दुनियेत एक मोठा स्कॅम सुरू आहे! सई यात पोलिस अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे.

क्राईम बीटसह आणखी रोमांचक प्रोजेक्ट्स!
सई डब्बा कार्टेलनंतर ती क्राईम बीट या वेबसीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. वर्षभर तिच्या हातात वेगवेगळ्या जॉनरचे प्रोजेक्ट्स आहेत, त्यामुळे तिच्या प्रेक्षकांसाठी हे वर्ष प्रचंड मनोरंजक ठरणार आहे.
धाडसी, बिनधास्त आणि सशक्त भूमिकांची ओळख!
सईने तिच्या कारकिर्दीत नेहमीच वेगळ्या, दमदार आणि हटके भूमिका निवडल्या आहेत. ती स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन विविध आव्हानं स्वीकारते आणि प्रत्येक पात्राला आपली वेगळी छाप देते. डब्बा कार्टेल, ग्राउंड झीरो, मटका किंग यांसारख्या आगामी प्रोजेक्ट्समुळे ती बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये सातत्याने नाव कमावत आहे.