Zee Marathi Amba Mahotsav 2025: झी मराठीचा आंबा महोत्सव रंगला, कलाकार रमले खेळात

प्रेक्षकांच्या हृदयात आपली खास जागा निर्माण करणारी ‘झी मराठी’ वाहिनी यंदा एक आगळावेगळा उपक्रम घेऊन आली – ‘आंबा महोत्सव २०२५’. या पहिल्यावहिल्या सोहळ्याचे निवेदन प्रणव रावराणे, तितिक्षा तावडे आणि अधोक्षज कह्राडे या तिघांनी एकत्रितपणे केले. त्यांची भन्नाट केमिस्ट्री आणि उत्साही सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचं वातावरण पसरलं. या खास महोत्सवात आंब्याच्या संकल्पनेवर आधारित खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विविध मराठी मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांनी या खेळांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमाची सुरुवात झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर व्ही. आर. हेमा यांच्या भाषणाने झाली. झी मराठीवर ‘कमळी’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

झी नेटवर्कवरील पहिली मराठी वेब सिरीज ‘अंधार माया’ झी ५ घेऊन येत आहे. फर्स्ट लुक ‘आंबा महोत्सवात’ पाहुण्यांना दाखवण्यात आला. त्यावेळी निर्माती शर्मिष्ठा राऊत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ही वेब सिरीज शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी सार्थ मोशन पिक्चर्स या बॅनरखाली निर्मित झाली आहे.

यावेळी झी मराठी मालिकेतील अनेक कलाकार उपस्थित होते.

झी मराठी मालिकांमधील कलाकारांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतला.

आंब्याच्या थीमवर आधारित मजेशीर खेळ, हास्यविनोद आणि कलाकारांमधली आपुलकी सगळ्यांनी अनुभवली.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये अपूर्वाला, नेत्रा-अमेयच्या ‘त्या’ रात्रीचे सत्य समजू शकेल का ?

वैदेही-सानियाच्या कारस्थानांना कावेरी कशी सामोरी जाणार?

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More