स्टार प्रवाह(Star Pravah)वरील ‘तुझेच मी गीत गात आहे'(Tuzech Geet Mi Gat Ahe) ही मालिका निर्णायक वळावर येवून पोहचली आहे. अशातच आता मालिकेत अभिनेत्री उर्मिला कानिटकरची (Urmila Kanitkar) एन्ट्री झाली आहे. उर्मिलाला आपण मालिकेत स्वराच्या आईचे म्हणजेच वैदेही हे पात्र साकारले होते. मालिकेत वैदेही गंभीर आजारामुळे सगळ्यांना कायमची सोडून जाते असे दाखवण्यात आले होते. पण स्वराच्या आठवणींमधून ती नेहमी आपल्यासमोर येत होती. पण आता उर्मिला स्वराच्या आठवणीतून नाही तर मालिकेत एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंजुळा सातारकर ही भूमिका ती साकारत आहे. . मंजुळा हे पात्र वैदेही सारखे दिसणारे आहे. तिच्या येण्याने स्वराज आणि मल्हारच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.
नक्की वाचा: लग्नानंतर ९ महिन्यांचा ब्रेक, ‘श्रीमंताघरची सून’मधील रुपल नंद झळकणार नव्या भूमिकेत
याआधी आपण उर्मिलाला विविध भूमिकांमध्ये पाहिले आहे. कधी ग्लॅमरस तर कधी पारंपरिक अंदाजात आपण तिला पाहिले आहे. पण ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतला अंदाज आजवर तिने साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळा आणि हटके आहे. याआधी या मालिकेतील वैदेही या पात्राच्या निमित्ताने तिला पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा शिकायला मिळाला. आता मंजुळा सातारकर ही नवी व्यक्तिरेखा साताऱ्याकडची आहे. या भाषेचाही वेगळा गोडवा आहे. याआधी अशा पद्धतीचं पात्र तिने साकारलेलं नाही. या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषांचा लहेजा तिला आत्मसात करता येत आहे.
मालिकेत एकीकडे मंजुळा सातारकरची धडाकेबाद एन्ट्री होताना दित आहे तर दुसरीकडे स्वराज आणि मल्हारचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. मल्हारच आपले वडील आहेत ही गोष्ट स्वराजला कळली आहे. इतकी वर्ष वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या स्वराज म्हणजेच स्वराच्या आयुष्यातला हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. स्वराजला ही गोष्ट सांगायची आहे पण स्वराजने अपघातात त्याचा आवाज गमावला आहे. त्यामुळे स्वराज त्याच्या मनातली भावना कशी व्यक्त करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तेव्हा ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला विसरु नका.