झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amachi Collector) या मालिकेत सर्वांना प्रतिक्षा होती ती अप्पीच्या निकालाची. आणि अखेर तो दिवस आला आहे, जेव्हा अप्पी सर्व संकटांवर मात करत कलेक्टर झाली आहे. अप्पीचा निकाल १६ एप्रिलला लागणार असून अप्पीची मेहेनत फळास येणार आहे. ती कलेक्टर होणार आहे. अप्पीला निकालाबद्दल कल्पना नाही आहे. निकाल हाती येताच तिचा नवरा अर्जुन तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला बाहेर आणेल. तिथे बापू तिला ती कलेक्टर झाल्याचे सांगतील. आणि तिच्या आनंदाला पारावार उरणार नाही. गावात आधीच सगळ्यांना अप्पी कलेक्टर झाल्याचे छकुलीने सांगितले आहे. आणि म्हणूनच अर्जून, छकुली, दिप्या आणि सर्व गावकरी मिळून तिची मिरवणूक काढणार आहेत. जागोजागी अप्पीच्या नावाची रांगोळी गावात काढण्यात आलेली आहे. मिरवणूकीदरम्यान अप्पीवर अभिनंदनाचा वर्षाव होईल.
नक्की वाचा: लग्नानंतर ९ महिन्यांचा ब्रेक, ‘श्रीमंताघरची सून’मधील रुपल नंद झळकणार नव्या भूमिकेत
‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अप्पीची मुलाखत ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ‘उज्वल निकम’ (Ujjaval NIkam ) आणि लेखक आणि IAS ऑफिसर ‘विश्वास पाटील'(Vishwas Patil) यांनी घेतली होती. या मालिकेच्या निमित्ताने हे दोन ऑफिसर्स टेलीव्हिजनवर प्रथमच मालिकेत खरीखुरी भूमिका साकारताना दिसले. यावेळी अप्पीला छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chatrapati Shivaji Maharaj) उंची किती होती हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर अप्पीचे उत्तर ऐकून प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटेल. चार हजार सहाशे चार फूट उंच तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केला. साडेतीनशे वर्षांची गुलामी तोडून स्वराज्याचं तोरण बांधले. आता अशा माणसाची उंची आपण कशी मोजायची, असे उत्तर अप्पीने दिले. या उत्तराने तिने फक्त मुलाखतकारांचीच नाही तर प्रेक्षकांची मनं जिंकली.
अप्पीने तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर झाली आहे. तिला या संघर्षात तिचे बापू, नवरा अर्जुन, भाऊ दिप्या यांची खरी साथ मिळाली. पण आता कलेक्टर झाल्यावर तिचा खरा खडतर प्रवास सुरु होईल. तेव्हा ‘अप्पी आमची कलेक्टर’ एक तासाचा विशेष भाग १६ एप्रिल संध्या. ७ वा. झी मराठीवर नक्की पहा.