झी मराठी व्हॅलेंटाईन सप्ताह: समर–स्वानंदी आणि तारिणी–केदारचे रोमँटिक सरप्राईज!

या व्हॅलेंटाईन डे ला झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी खास रोमँटिक, भावनिक आणि मनोरंजक घडामोडी घेऊन येत आहे. आवडत्या मालिकांमधील पात्रांच्या आयुष्यात प्रेमाचे नवे रंग फुलताना पाहायला मिळणार आहेत.

वीण दोघातली ही तुटेना या मालिकेत आजी अधिरावर जबाबदारी टाकते की जसं ती स्वतः व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, तसंच काहीतरी खास समर आणि स्वानंदीसाठीही करायला हवं. अधिरा एक खास प्लॅन आखते आणि समर, स्वानंदी व रोहनला तातडीने एका ठिकाणी बोलावते.

तिथे पोहोचल्यानंतर कळतं की ही एक खास व्हॅलेंटाईन पार्टी आहे! या पार्टीत समर-स्वानंदीचे रोमँटिक क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. मात्र, आनंदाच्या या वातावरणात मल्लिका मीठाचा खडा टाकण्याचा प्लॅन आखते.

आता रोहन हे सगळं सहन करणार का? मल्लिकाचा डाव यशस्वी होणार का? या प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.

दुसरीकडे तारिणी मालिकेत टीम तारिणी केदारला चिडवते की व्हॅलेंटाईन डे असूनही तो तारिणीसाठी काही खास करत नाही. सरप्राईज म्हणून केदार टेडी घेऊन येतो; पण चुकून ते गिफ्ट काव्याजवळ पोहोचतं आणि त्याचा प्लॅन गोंधळात सापडतो.

यानंतर कौशिकी, युवराज-निशी आणि तारिणी-केदारला एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी पासेस दिले जातात. तिथे रोमँटिक डान्स, मजेदार गेम्स आणि परफेक्ट सेलिब्रेशनची तयारी असते. या खेळांमधून केदार आणि तारिणीमध्ये जवळीक वाढताना दिसते.

मात्र अचानक तारिणी केदारला दूर ढकलते आणि काहीतरी बोलते, ज्यामुळे सगळेच थक्क होतात. नेमकं ती काय बोलते? आणि त्याचा त्यांच्या नात्यावर काय परिणाम होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

प्रेम, सरप्राईज, गोंधळ आणि नात्यांमधील नवे वळण अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका ‘वीण दोघातली ही तुटेना’ सायं. ७:३० वा. आणि ‘तारिणी’ रात्री ९:३० वा., फक्त आपल्या झी मराठीवर.

Spread the love

Related posts

स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अर्जुन-सायलीच्या भूमिकांची अदलाबदल!

पहिली केस, मोठी जबाबदारी! अॅडव्होकेट ऊर्जाच्या न्यायलढ्याला उज्ज्वल निकम यांचे आशीर्वाद

‘इंद्रायणी’चे 600 भाग पूर्ण; कांची शिंदेने सेटवर कलाकार व कॅमेऱ्यामागील टीमसोबत साजरा केला आनंदाचा क्षण

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More