विजया बाबर म्हणते, “शिवस्तुती पाठ करणं माझ्यासाठी खूप खास होतं” – ‘कमळी’ मालिकेच्या प्रोमोमागची कथा

झी मराठीवर लवकरच ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा शिवस्तुतीवर आधारित प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये ‘कमळी’ची भूमिका साकारणारी विजया बाबर हिने त्या अनुभवाबद्दल खास आठवणी शेअर केल्या.

ती म्हणते, “मी जेव्हा ढोल-ताशा पथक पाहायचे, तेव्हा सुरुवातीला ते ज्या ताकदीने शिवस्तुती म्हणायचे ते मला खूप भावायचं. तेव्हा नेहमी वाटायचं की, आपल्याला ही शिवस्तुती म्हणता यायला हवी. कारण त्या घोषणेत, त्या शब्दांमध्ये, एक वेगळीच ऊर्जा असते – अंगावर काटा आणणारी.”

“‘कमळी’ मालिकेमुळे मला अखेर ती संधी मिळाली. ही शिवस्तुती आता माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे, आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो – कारण आता मला ती पाठ आहे. मात्र ही प्रक्रिया सोपी नव्हती. मला ती नीट पाठ करण्यासाठी दोन दिवस लागले. त्या काळात मी सतत ती ऐकत होते – योग्य उच्चार, योग्य लय राखणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.”

ती पुढे सांगते, “जेव्हा आम्ही तो प्रोमो शूट करत होतो, तेव्हा पूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. माझा शिवस्तुतीचा भाग आम्हाला सूर्यास्तापूर्वी पूर्ण करायचा होता. त्यामुळे दडपण होतं, पण सीन एकदम सुंदर झाला. सेटवर प्रत्येकाला तो सीन खूप आवडला.”

‘कमळी’ लवकरच आपल्या भेटीला येते आहे, फक्त झी मराठीवर.

Spread the love

Related posts

टाइम्स स्क्वेअरवर झळकली ‘कमळी’! मराठी मालिकेनं रचला नवा इतिहास

Smriti Irani : स्मृती इराणी पुन्हा ‘तुलसी’च्या रुपात! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ मधून लूक लीक

विद्या बालनचं मराठी मालिकेत आगमन; शिक्षिकेच्या भूमिकेत झळकणार, प्रोमो झाला व्हायरल!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More