अबब! तब्बल ‘इतके’ ऍक्शन सीन्स असलेल्या सलमानच्या ‘टायगर 3’ने बनवला जबराट रेकॉर्ड

सध्या सगळीकडे फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे, आणि तो सिनेमा म्हणजे ‘टायगर ३’. सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने, मागील अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. या सिनेमाच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवत रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे या सिनेमाकडून सुद्धा अशाच प्रतिसादाची सर्वांना अपेक्षा आहे.

यशराजचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा हा हेरगिरीवर आधारित सिनेमा येत्या रविवारी अर्थात १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर खूपच धूम केली आहे. इथे देखील या सिनेमाने अनेक रेकॉर्ड तयार केले आहे. ‘टायगर 3’चा ट्रेलर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की, या भागात आधीच्या दोन चित्रपटांपेक्षा जास्त थरार ऍक्शन सीन्स असणार आहे. सध्या याच ऍक्शन सीन्सची खूपच चर्चा देखील होत आहे.

मनीष शर्मा दिग्दर्शित या टायगर ३ बद्दल खुद्द मनीष यांनी सांगितले की, “‘टायगर आणि जोया’ अर्थात सलमान खान आणि कॅटरिना ही खूपच लोकप्रिय, प्रसिद्ध आणि मोठी जोडी समजली जाते. या दोघांनी त्यांचे नाते टिकवण्यासाठी आणि देशाला गरज पडेल तेव्हा मदतीसाठी सतत संघर्ष केला आहे. त्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. या खेपेला तर सर्वात मोठा डाव असणार आहे, त्यामुळे त्याला साजेसे असे ऍक्शन सीन्स देखील सिनेमात असणे अपेक्षित होते.”

पुढे मनीष यांनी सांगितले की, “टायगर ३ मधील ऍक्शन सीन्स हे आपल्या काळातील सर्वात मोठ्या ऍक्शन असलेल्या हॉलिवूड पातळ देखील टक्कर देतील असे आहेत. सलमान आणि कॅटरिना या सिनेमात आव्हानांना सामोरे जातात जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहे. या सिनेमात १२ सर्वोत्कृष्ट आणि मोठे ऍक्शन सीन्स असणार आहे. जे तुम्हाला सिनेमा बघताना खिळवून ठेवतील. हे सीन्स करण्यासाठी सर्वानीच खूप जास्त मेहनत घेतली आहे.”

भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील आतापर्यंतचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांनी टायगर 3 मध्ये टायगर आणि झोया या हेर असणाऱ्या भूमिका साकारल्या आहेत. आधीच्या चित्रपटांना मिलेल्या प्रतिसादानंतर यशराज सोबतच सलमानला देखील या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान आदित्य चोप्रा निर्मित, टायगर 3 हा सिनेमा दिवाळीच्या दिवशी रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगु मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डंकी सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणे प्रदर्शित, सोनू निगमच्या आवाजातून जाणवते देशाबद्दलची तडफड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More