२७ फेब्रुवारी २००२ ही तारीख भारताच्या इतिहासातील काळी तारीख म्हणून ओळखली जाते. या दिवशी गुजरातमधील गोध्रा शहरात कारसेवकांनी भरलेल्या ट्रेनला आग लावण्यात आली. त्यात ९० प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्यातील हे यात्री जळत असतांना बाहेरुन डबे बंद करण्यात आले होते. गाडीतील लोकं जिवंत जळत असतांना बाहेर मोठा जनसमुदाय ही घटना बघत होता. या घटनेचा परिणाम म्हणजे गुजरातमध्ये २००२ मध्ये मोठी दंगल झाली. पुढे या गोध्रा येथील घटनेची तपासणी करण्यात आली. दोषींना अटक करण्यात आली. साबरमती एक्स्प्रेसच्या या घटनेचा रिपोर्टाही तयार झाला. दोषींना शिक्षा झाली. पण यातून या घटनेत मारल्या गेलेल्या निर्दोष नागरिकांच्या नातेवाईंकांच्या मनातील दुःख काही कमी झालं नाही. या वेदनामयी घटनेचा ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेत विक्रांत मेसीची प्रमुख भुमिका असलेल्या या चित्रपाटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. हा टिझर पाहून साबरमती एक्सप्रेसच्या त्या निष्पाप नागरिकांचे दुःख पाहून हृदय पिळवटून जात आहे. (The Sabarmati Report Teaser)
२७ फेब्रुवारी २००२ झालेल्या गोध्रा जळीतकांडाचे पडसाद अनेक वर्ष उमटत राहिले. याच गोध्रा जळीतकांडावर आधारीत ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट लवकरच येत आहे. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसला जाळल्याचा तपास करणाऱ्या दोन पत्रकारांची कथा यात आहे. विक्रांत मेसीशिवाय राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा हे यात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक रंजन चंदेल असून चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ चा टिझर नुकताच प्रदर्शित झाल्यानं पुन्हा त्या धक्कादायक घटनेची चर्चा आहे. वास्तविक ‘द साबरमती रिपोर्ट’ ची घोषणा झाली, तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता आहे.
२ ऑगस्ट २०२४ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणा-या या चित्रपटात विक्रांत मेसी पत्रकार आणि वृत्तनिवेदक आहे. ही घटना झाल्यावर सर्वांनाच पहिला धक्का बसला त्यानंतर दुःख आणि मग प्रत्येकाच्या मनात एक चीड होती. या सर्व भावना विक्रांत मेसीने आपल्या अभिनयातून व्यक्त केल्याचे टिझरवरुन स्पष्ट दिसते. अष्टपैलू अभिनेता विक्रांत मेसी त्याच्या शेवटच्या बारावी फेल चित्रपटामुळे अजूनही चर्चेत आहे. आयपीएस मनोज शर्माची भूमिका करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. विक्रांतच्या या चित्रपटाने केवळ रुपेरी पडद्यावरच नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चांगली कामगिरी केली आहे. आता विक्रांत साबरमती रिपोर्टमध्ये पत्रकाराच्या भूमिकेतून पुढे येत आहे. त्याचा हा अभिनयही दमदार झाला आहे.
साबरमती एक्सप्रेसची घटना अतिशय दुःखदायक होती. त्यानंतर गुजरातमध्ये मोठी दंगल घडली. त्यामुळे या घटनेवर आधारीत चित्रपट काढतांना सर्वात मोठी कसरत होती, ती चित्रपटाची कथा लिहितांना. हा संवेदनशील विषय तेवढ्याच काळजीपूर्वक हाताळल्याचे सह-निर्माते अमूल व्ही मोहन यांनी सांगितले आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट आधी तयार करुन मग ती एकता कपूरला दाखवण्यात आली. विषय संवेदनशील असल्यामुळे ती स्विकारली जाईल की नाही याची शंका होती. मात्र एकता कपूरने चित्रपट करण्यासाठी होकार दिल्यानं मोठा आनंद झाल्याचेही अमूल व्ही मोहन यांनी सांगितले.
‘द साबरमती रिपोर्ट’ची कथा लिहितांना संशोधन करण्यासाठी बराच काळ गेला. त्यासाठी मोठी टिम तयार केली होती. आम्हाला यातून केवळ सत्य दाखवायचे आहे, त्यामुळे त्या संपूर्ण घटनेची पाश्वभूमीही शोधण्यासाठी आणि मग त्याचा अभ्यास करण्यासाठी काही काळ गेल्याचे अमूल व्ही मोहन यांनी सांगितले. चित्रपटाची कथा पूर्ण झाल्यावर त्याच्यासाठी प्रमुख अभिनेत म्हणून विक्रम मेसीच सर्वांची पहिली पसंती होता.
साबरमती एक्स्प्रेसमधील दुःखद घटनेच्या २२ वर्षानंतर लपलेले अज्ञात सत्य दाखवण्यात आले आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ २ ऑगस्टला प्रदर्शित होईल. यापूर्वी हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र देशभरातील लोकसभेच्या निवडणुकांमुळे त्याची तारीख बदलण्यात आली. आता हा चित्रपट ‘पुष्पा २’ आणि ‘स्त्री २’ या चित्रपटांसोबत बॉक्सऑफीसवर येणार आहे.
=====
भन्साळींच्या ‘हिरामंडी’मागचा ‘हा’ इतिहास ठाऊक आहे का?
श्रीकांथ-शिक्षीत समाजाला डोळस करणारा चित्रपट
=====