‘द रेल्वे मॅन’च का बनली यशराजची पहिली सिरीज? दिग्दर्शक शिव रवैलने दिले उत्तर

सध्या सगळीकडे फक्त एकाच सिरीजची चर्चा आहे, आणि ती म्हणजे ‘द रेल्वे मॅन’. बाबील खान, के के मेनन, दिव्यानंदु आणि आर माधवन यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेल्या या सिरीजचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. यश राजची पहिली सिरीज असलेल्या रेल्वे मॅनने प्रेक्षकांवर आपली चांगलीच छाप सोडली आहे. रेल्वे मॅन ही भोपाळमधील भारतीय रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या विलक्षण वीरतेची कहाणी आहे. हवेतील अदृश्य शत्रूशी झुंज देत गॅस गळतीच्या भयंकर रात्री आपल्या सहकारी नागरिकांना वाचवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या सिरिजबद्दल आणि यश राजने दिलेल्या पाठिंब्याबद्दल रेल्वे मॅनचे दिग्दर्शक असलेल्या शिव रवैल मनमोकळेपणाने त्याचे मत व्यक्त केले आहे.

नुकतीच यशराजची रेल्वे मॅन ही सिरीज प्रदर्शित झाली. या सिरीजमध्ये वीरता, आशा आणि मानवतेची एक सुंदर आणि रंजक कहाणी पाहायला मिळणार आहे. या सिरिजबद्दल, आदित्य चोप्राबद्दल आणि स्क्रिप्टबद्दल शिवने सांगितले. आदित्य चोप्रा यांनी या सिरीजच्या स्क्रिप्टवर दोन वर्ष काम केले. स्क्रिप्टला प्रत्येक बाजूने निरखून अभ्यासपूर्वक त्यावर चर्चा केली. ही स्क्रिप्ट डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्वच बाजूनी सक्षम असली पाहिजे यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचे शिवने सांगितले.

पुढे शिव रवैल म्हणाला, “एक गोष्ट आहे जी मला माझे गुरु असलेल्या आदित्य चोप्रा यांच्याबद्दल माहित आहे. ते असे काही बनवत नाही जे दर्शकांना पाहण्यासाठी आकर्षक नसेल. मला वाटते हेच कारण असेल की, मागील काही पिढ्यांपासून यशराज आधुनिक संस्कृतीला प्रभावित करत लोकांना आवडणाऱ्या कलाकृती बनवत यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. आदित्य चोप्राने यशराजची पहिली सिरीज म्हणून रेल्वे मॅनला निवडले. मात्र त्याआधी दोन वर्ष आणि आदित्यचा होकार मिळवण्यासाठी स्क्रिप्टच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींवर काम केले. त्याला यशराजची पहिली सिरीज यशराजसोबतच लोकांसाठी देखील संस्मरणीय बनवायची होती.”

“आदित्य चोप्रा यांची इच्छा होती की, या सिरीजचा स्टार असा असावा जो डिजिटल प्लॅटफॉर्मवर कधीही पहिला गेला नसेल. यासाठी त्यांनी पाहिजे तेवढी वाट बघण्याचे ठरवले. जोपर्यंत त्यांना स्वतःला विश्वास बसत नाही की ही सिरीज आता तयार होऊ शकते तोपर्यंत त्यांनी आम्हाला अनेक बदल करायला सांगितले.” असे देखील शिवने सांगितले.

या सिरीजमध्ये बाबील, के के मेनन, माधवन, दिव्यानंदु या सर्वच कळकरांनी अतिशय प्रभावी अभिनय केला आहे. या सिरीजचे दिग्दर्शन शिव रवैलने केले असून, शिव मागील दहा वर्षांपासून आदित्य चोप्रासोबत यशराजमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. दरम्यान ही सिरीज आता प्रदर्शित झाली असून, नेटफ्लिक्सवर बघण्यासाठी उपलब्ध आहे.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डंकी सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणे प्रदर्शित, सोनू निगमच्या आवाजातून जाणवते देशाबद्दलची तडफड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More