स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अर्जुन-सायलीच्या भूमिकांची अदलाबदल!

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ आता प्रेक्षकांसाठी एक वेगळंच वळण घेऊन येत आहे. महाराष्ट्राची लाडकी जोडी अर्जुन-सायली यांच्या आयुष्यात मोठा बदल घडणार असून, दोघेही एकमेकांच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

घरात दिवसभर राबणाऱ्या गृहिणीच्या कष्टांची किंमत आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्यांचं ओझं — या दोन्ही गोष्टी एकमेकांना अनुभवातून समजाव्यात, या उद्देशाने अर्जुन आणि सायलीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. आता सायली ऑफिस आणि कोर्टातील कामांची धुरा सांभाळणार, तर अर्जुन स्वयंपाकघरापासून घरातील प्रत्येक जबाबदारी खांद्यावर घेणार आहे.

दोघांसाठीही हा अनुभव नवीन असला तरी नात्यातील समज, आदर आणि समानतेचं महत्त्व अधोरेखित करणारा ठरणार आहे. या भूमिकांच्या अदलाबदलीतून त्यांच्या नात्याला नवं आयाम मिळणार असून, प्रेक्षकांनाही एक हळवा आणि विचार करायला लावणारा संदेश मिळणार आहे.

यंदाचा व्हॅलेंटाईन डे अर्जुन-सायलीसाठी खास ठरणार आहे. त्यांच्या नात्यातील पहिलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि एकमेकांच्या संमतीने झालेलं पहिलं लग्न १४ फेब्रुवारीलाच झालं होतं. त्यामुळे बदलेल्या भूमिकांसोबत ते हा खास दिवस साजरा करणार आहेत.

अर्जुन-सायलीचा हा नवा अंदाज आणि मालिकेतील धमाकेदार वळण पाहण्यासाठी ‘ठरलं तर मग’ मालिका दररोज रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर नक्की पाहा.

Spread the love

Related posts

झी मराठी व्हॅलेंटाईन सप्ताह: समर–स्वानंदी आणि तारिणी–केदारचे रोमँटिक सरप्राईज!

पहिली केस, मोठी जबाबदारी! अॅडव्होकेट ऊर्जाच्या न्यायलढ्याला उज्ज्वल निकम यांचे आशीर्वाद

‘इंद्रायणी’चे 600 भाग पूर्ण; कांची शिंदेने सेटवर कलाकार व कॅमेऱ्यामागील टीमसोबत साजरा केला आनंदाचा क्षण

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More