“तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं सोडून दिलंय…” तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंना भावनिक शुभेच्छा पोस्ट

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५७ वा वाढदिवस. वाढदिवस साजरा करण्यासाठी ते कुटुंबासोबत मुंबईबाहेर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना एक खास पत्र लिहून “शिवतीर्थावर न येता आपण लवकरच भेटू” असं सांगितलं आहे. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीतही मनसे कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत त्यांच्या वाढदिवसाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.

राज ठाकरे यांना राजकारण, समाजकारण आणि मराठी अस्मितेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात मराठी चित्रपटसृष्टीही मागे राहिलेली नाही. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. यातील सर्वात लक्षवेधी पोस्ट ठरली आहे ती अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची.

तीने राज ठाकरे यांच्यासोबतचा एक खास फोटो शेअर करत लिहिलं आहे –

“मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला, मराठी भाषेच्या पोशिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि या सगळ्या पलीकडे एका मनस्वी, सच्च्या, अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा!

राजसाहेब… खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केव्हाच सोडून दिलं!

देव तुम्हाला दीर्घायू देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो! हसत राहा…”

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ या चित्रपटाची निर्मितीही तेजस्विनी पंडित ने केली होती. विशेष म्हणजे, हा सिनेमा राज ठाकरे यांच्या प्रेरणेतून साकारला गेला होता आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता.

या पोस्टनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

“मराठी माणसाच्या पाठीराख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”,

“पूर्ण भारतात एकमेव प्रॅक्टिकल राजकारणी”,

“राजसाहेबांसारखी प्रामाणिक व्यक्ती दुर्मिळ”,

“आपल्यामुळेच अनेकांच्या आशा जिवंत आहेत” – अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या आहेत.

नेहमीप्रमाणे तेजस्विनीची शब्दरचना आणि तिचा आदरभाव नेटकऱ्यांच्या मनाला भिडला. तिच्या या पोस्टने राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वातील भावनिक बाजू पुन्हा एकदा लोकांसमोर आणली आहे.

Spread the love

Related posts

प्रेमरंग सनेडो: अभिजीत सावंतचं नवरात्रीतलं हिट गाणं!

अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन; तेजस्विनी पंडितला मातृशोक, मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा

५० वर्षांचा ‘शोले’चा सुवर्ण सोहळा : महाराष्ट्र डाक सर्कलकडून खास स्टॅम्प व पिक्चर पोस्टकार्ड अनावरण

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More