Tejas Movie Review: सुमार ‘झेप’

Tejas Movie Review In Marathi

आजवर ‘देशभक्ती’ आणि ‘शौर्य’ यावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट बनले आहेत. साधारणपणे, या चित्रपटांमध्ये अनेकदा असे नायक असतात जे देशासाठी आनंदाने बलिदान देतात. पण दिग्दर्शक सर्वेश मेवाड़ा याच्या ‘तेजस‘ या चित्रपटातील या दोन नायिकांची शौर्यगाथा पाहून काहीतरी नवीन घेतेय; असं तुम्ही प्रथमदर्शी म्हणाल. तथापि, पटकतेतची फोल बांधणी आणि आजच्या तारखेला सिनेमात बडा चेहरा असून देखील सुमार ‘व्हीएफएक्स’च्या कामामुळे सिनेमाचा आकाशात झेप घेता आलेली नाही. सिनेमाचे वातावरण चकचकीत करण्याच्या नादात सिनेमाच्या कथानकाचा प्रभाव खालावला आहे. त्यात कंगना कडून अभिनेत्री म्हणून असलेल्या अपेक्षा देखील फोल ठरतात. (Tejas Movie Review)

कथेत, तेजस गिल (कंगना रणौत) ही भारतीय हवाई दलाची एक धाडसी लढाऊ पायलट आहे, जी चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात, तिच्या वरिष्ठांच्या आदेशाची पर्वा न करता, वायुसेनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा जीव वाचवतो. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्या सैन्य अधिकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी; तपास समिती तेजसच्या या कृत्यावर कारवाई करणार येते, पण, नंतर वृत्त येते की पाकिस्तानी दहशतवाद्यांनी देशाच्या एका अत्यंत महत्वपूर्ण गुप्तचराला ओलीस ठेवले आहे. आता जर भारताने पाकिस्तानची अट मान्य केली नाही तर ते त्याचा शिरच्छेद करतील. तेजस आणि त्याची सहकारी पायलट आफिया (अंशुल चौहान) यांना भारतीय गुप्तचर एजंटच्या बचाव कार्यासाठी पाठवले जाते. जेव्हा या दोघी बचावकार्यासाठी जातात तेव्हा त्यांना कळते की दहशतवाद्यांना राम मंदिरावर बॉम्बस्फोट करून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करायची आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात तेजसचा भूतकाळ अत्यंत क्लेशकारक आहे, तिने तिचे आई-वडील, भाऊ आणि होणाऱ्या नवऱ्याला तिने गमावले असते. केवळ तिचा भूतकाळ तिला आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास प्रेरित करतो. (Tejas Movie Review In Marathi)

दिग्दर्शक सर्वेश मेवाडा याच्या कथेत दोन नायिका एकावेळी मध्यवर्ती भूमिकेत पाहणे प्रेरणादायी वाटते. पण, चित्रपटाची अडचण अशी आहे की दिग्दर्शकाचा संपूर्ण भर कथानक रंजक करण्यावर नव्हे तर नायिकांची वीरता प्रस्थापित करण्यावर जातो. कथेचा पूर्वार्ध खूपच संथ आहे. उत्तरार्धात सिनेमा वेग पकडतो, परंतु क्लायमॅक्स पर्यंत सिनेमा पुन्हा रटाळ होतो. सोबतच सर्व मामला प्रेडिक्टेबल होऊन बसतो. तेजसचे हवाई दलातील प्रशिक्षण, तिच्या कुटुंबाशी असलेले तिचे नाते आणि तिचा लव्ह ट्रॅक आदींभोवती बराचवेळ सिनेमा गोल-गोल गिरकी घालतो. पण, बचाव मोहिमेतील हवाई लढा आणि पाकिस्तानात घुसून भारतीय गुप्तहेराची सुटका करण्याचे तंत्र आणि प्लनिंक पटकथेत अत्यंत सुमार दिसते.

‘तेजस’चे हवाई स्टंट प्रभावित करतात, तथापि, चित्रपटाचा व्हिएफएक्स हा कमकुवत दुवा आहे. अनेक दृश्ये टॉम क्रूझच्या चित्रपटांची आठवण करून देतात. कथा भावनिक पातळीवरही प्रेक्षकांना जोडण्यामध्येही कमी पडते. तेजस आणि आफिया यांच्यातील संवाद, ‘जर आम्ही यशस्वी झालो नाही, तर लोक म्हणतील की आम्ही मुलांना पाठवायला हवे होते’ हे देखील हा संवाद नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि काही अंशी पुरुषप्रधान समजला चिमटा काढणारा आहे. हरी वेदांतम यांच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये वाळवंटातील हवाई हल्ले, उड्डाणे आणि युद्धांचे आकर्षक चित्रण आहे. शाश्वत सचदेव यांच्या संगीतात ‘ऐ दिल है रांझना’, ‘जान दा’ सारखी गाणी चांगली जमून झाली आहेत. आशिष विद्यार्थी यांनी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. चित्रपटातील सहाय्यक कलाकारांना फारशी संधी मिळालेली नाही. पण, एकंदरच सिनेमा सिनेमा ठीक-टीका आणि एखाद-दुसऱ्या वेळा बगण्याजोगा आहे.

सिनेमा : तेजस (Tejas)
दिग्दर्शक : सर्वेश मेवाड़ा
कलाकार : कंगना रणौत, अंशुल चौहान, आशीष विद्यार्थी, वरुण मित्रा, विषक नायर
दर्जा : अडीच स्टार

Spread the love

Related posts

Mr. & Mrs. Mahi Movie Review : भावनिक यशाचा षटकार!

Maidaan Movie Review: रोमांचक किक!

Crew Review: कॉमेडीची मनोरंजक फ्लाईट!

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More