‘दशावतार’ चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ भैरवी रसिकांच्या भेटीस
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील भावपूर्ण ‘रंगपूजा’ भैरवी नुकतीच प्रदर्शित झाली. गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र या भन्नाट त्रिकुटाने रंगवलेलं हे गीत कलावंताच्या कलेवरील श्रद्धा आणि समर्पणाची कहाणी सांगतं.