‘इंद्रायणी’चे 600 भाग पूर्ण; कांची शिंदेने सेटवर कलाकार व कॅमेऱ्यामागील टीमसोबत साजरा केला आनंदाचा क्षण
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ने 600 भागांचा टप्पा पार केला आहे. या खास प्रसंगी सेटवर कलाकारांसह संपूर्ण तांत्रिक टीमने केक कापत आनंद साजरा केला. अभिनेत्री कांची शिंदेने या प्रवासाबद्दल व्यक्त केल्या भावनिक भावना, तर कथेतही मोठा थरार पाहायला मिळणार आहे.