‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील मल्हारने सर्वोत्कृष्ट वडील हा पुरस्कार पटकावला. लक्ष्मी, स्वरा, पिहू, दीपिका आणि कार्तिकी या बालकलाकारांना सर्वोत्कृष्ट मुलगी हा पुरस्कार विभागून देण्यात आला.‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पूने सर्वोत्कृष्ट सूनेचा पुरस्कारपटकावला. अरुंधतीला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा ठरली सर्वोत्कृष्ट आई तर सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार हा श्वेताने पटकावला.‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य ठरली.स्टार प्रवाहचा फटाका हा विशेष पुरस्कार ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकीला देण्यात आला.सर्वोत्कृष्ट खलनायिका हा पुरस्कार रंग माझा वेगळा मालिकेतील श्वेता आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मोनिकाला विभागून देण्यात आला.संजना सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस आणि स्टार प्रवाहची इन्स्टा स्टार ठरली.सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी ठरली लग्नाची बेडी मालिकेतील राघव-सिंधूअभिनेता सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून गौरवण्यात आले.ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना स्टार प्रवाहचा विशेष सन्मान देण्यात आला.