कलाकार शूटिंगच्या निमित्ताने अनेक तास एकत्र असतात. चित्रपट असो, मालिका असो कलाकार तासोंतास सोबत घालवतात. घरच्यापेक्षा जास्त ते सेटवरच जास्त असतात. अशा वेळेस त्यांचे इतर कलाकारांसोबत नाते अधिकच घट्ट होते. ते एकमेकांना देखील खूपच उत्तमपणे ओळखू लागतात. अशावेळेस आपल्याला मालिका, चित्रपटांच्या सेटवर तयार झालेली अनेक उत्तम मैत्रीची उदाहरण पाहायला मिळतात. ही मैत्री जरी शूटिंगच्या निमित्ताने तयार झालेली असली, तरी ती वर्षानुवर्षे तशीच टिकते आणि वृद्धिंगत होते. सध्या मराठी मनोरंजनविश्वात अशाच एका नवीन झालेल्या अतिशय सुंदर दोन मैत्रिणींची खूपच चर्चा होत आहे.
मैत्री एक असं नातं आहे जे कधी ही ठरवून जुळत नाही. जिथे विचार जुळतात मैत्री आपली आपणच तयार होते आणि जर अशी मैत्री तुमच्या कामाच्या जागी निर्माण झाली तर कमावरचा कठीण दिवस ही सहज निघून जातो. मैत्रीच्या नावाखाली एक उत्तम सोबत आणि साथ असेल तर काम करण्याचा एक वेगळा हुरूप आणि आनंद मिळतो. उत्तम, लाडकी मैत्रीण सोबत असेल तर अशा वेळेस कधी कधी आलेली मरगळ देखील झटकन बाजूला होते आणि एका वेगळ्याच एनर्जीसोबत आपण कामाला सुरुवात करतो.
सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका कमालीची गाजत आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत त्यांची उत्कंठा वाढवत आहे. याच मालिकेत सध्या नेत्रा आणि इंद्राणी पंचपिटिकेचे रहस्य सोडवताना दिसत आहे. मालिकेत सध्या या दोघींचे सीन्स खूपच असून, त्यांच्यावर मालिका जास्त केंद्रित झाली आहे. त्यानिमित्ताने या दोघी बराच काळ एकत्र घालवताना दिसत आहे. यामुळेच दोघींची खूपच चांगली मैत्री झाली असून, त्यांची ही मैत्री सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेत्री श्वेता मेहेंदळेला तितिक्षाच्या रूपात एक मस्त मैत्रीण मिळाली आहे. आपल्या मैत्री बद्दल बोलताना श्वेता म्हणाली. ‘मी तितिक्षाला पहिल्यांदा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगीच्या’ सेट वर भेटली आणि पहिल्या भेटीतच आमची वाइब मॅच झाली. पहिल्या टेक पासून आम्ही खूप सहज पणे सीन्स करायला लागलो. आमची केमिस्ट्री तुम्हाला स्क्रीनवर ही पाहायला मिळत असेल. माझं तितिक्षा बद्दल पहिल्या भेटीत थोडं वेगळं मत होतं मला वाटलं की ती खूप शांत आहे. पण जशी आमची मैत्री वाढली मला कळले की ती ही माझ्या सारखी मस्तीखोर आहे. सेटवर जर कधी तितिक्षा नाही आली किंवा तिचा लेट कॉल टाईम असेल तर मी आतुरतेने तिची वाट पाहत असते. आऊटडोअर शूटिंग असेल तर आम्ही ठरवून एकत्र जातो. आमची सेटवरची टोपण नावं अशी नाहीयेत अजून, पण मी तितिक्षाला ‘टी’ म्हणून हाक मारते आणि तितिक्षा मला इंदू म्हणते. आमची मैत्री निखळ आहे.
नेत्रा आणि इंद्राणीच्या जोडीला असच प्रेम द्या आणि बघायला विसरू नका ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता आपल्या झी मराठीवर