‘किंग’ आणि ‘क्वीन’ एकाच मंचावर – WAVES 2025 मध्ये गाजलं सत्र

WAVES 2025 समिटच्या The Journey: From Outsider to Ruler moderated या खास सेशनमध्ये शाहरुख आणि दीपिका सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी चित्रपटातील प्रवास आणि आयुष्यावर भाष्य केले, यावेळी करण जोहर यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

दीपिका पदुकोणने शाहरुख खानसोबत 2007 मध्ये ओम शांती ओम चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, ज्यात चेन्नई एक्सप्रेस, पठाण आणि जवान यांचा समावेश आहे. या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे.

शाहरुख खान या सत्रात म्हणाले, “भारतीय चित्रपटांसाठी आणखी थिएटर्सची गरज आहे, खास करून छोटे थिएटर्स आणि परवडणारी तिकिटं जेणेकरून चित्रपट देशभरातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचू शकतील.”

आपल्या आयुष्याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाले, “मी सेटवर नसताना शांततेत असतो. तरुणपणी मी थोडा बिनधास्त होतो, पण त्या बिनधास्तपणामुळेच मी आज इथे आहे.”

दीपिकाने आपल्या 18 वर्षांच्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रवासावर विचार केला. “18 वर्षांच्या वयात मोठ्या शहरात येणं आणि स्वतःचा मार्ग शोधणं खूप आव्हानात्मक होतं. पण आज मागे वळून पाहिलं, तर वाटतं की मी चांगलं काम केलं आहे.”

शाहरुख खानने दीपिकाच्या मातृत्वाच्या भूमिकेबद्दल कौतुक करताना सांगितलं, “दीपिका ज्या भूमिकेत सर्वाधिक उत्कृष्ट दिसेल, ती म्हणजे आईच्या भूमिकेत – ती एक उत्कृष्ट मां असेल.”

WAVES समिटच्या या सत्रात शाहरुख व दीपिकाच्या भविष्याच्या योजनांबद्दलही काही exciting अपडेट्स दिल्या आहेत. लवकरच, King चित्रपटात दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत!

Spread the love

Related posts

Ajay Devgn Returns to Comedy with ‘Son of Sardaar 2’, Set for July 25 Release

“मी दिवसाला १० तास काम करते”: दीपिकाच्या ८ तासांच्या मागणीवर जिनिलिया देशमुखचं मत

Diljit Dosanjh & Ahan Shetty Join Sunny Deol and Varun Dhawan for Border 2 Shoot at NDA Pune

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More