‘समसारा’ सिनेमाच्या निमित्ताने मराठी मालिकाविश्वातील ‘ही’ लोकप्रिय जोडी पुन्हा येणार एकत्र

मालिकांच्या माध्यमातून आजपर्यंत आपण अनेक सुपरहिट आणि कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील अशा जोड्या पाहिल्या आहेत. मालिका संपल्यानंतरही या जोड्यांची क्रेझ आणि लोकप्रियता अजूनही टिकून आहे. अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे सायली संजीव आणि ऋषी सक्सेना यांची. झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांसमोर आली, आणि त्यांच्या मनात स्थान निर्माण करून गेली. या दोघांना रसिकांचे मोठे प्रेम मिळाले. मालिका संपल्यानंतर अनेकदा त्यांच्या फॅन्सने त्यांना पुन्हा एकत्र काम करण्याची विनंती केली होती. मात्र तसा काही योग जुळून न आल्याने त्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती.

परंतु आता पुन्हा एकदा सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र यावेळी ही जोडी मालिका नाही तर एका चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. “समसारा” (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा सोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.

संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या “समसारा” या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर लढे करत आहेत. सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल अजून माहिती समोर आली नसून, कदाचित हा सिनेमा नवीन वर्षात प्रदर्शित होऊ शकतो.

“समसारा” या चित्रपटाची कथा अतिशय अनोखी आहे. गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव, असूर यांच्यात युद्ध सुरू होते. त्यामुळे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अत्यंत वेगळी गोष्ट आणि उत्तम स्टारकास्ट यांचा मिलाफ “समसारा” या चित्रपटात झाला आहे. त्याशिवाय प्रेक्षकांची आवडती सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकत्र येणं हे महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे.

Spread the love

Related posts

The Roshans: Netflix Docu-Series Explores a Bollywood Legacy

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More