WAVES 2025 : सैफ म्हणाला – OTT हे भारतीय लोककथा जगासमोर आणण्याचं सर्वोत्तम माध्यम आहे.

Waves Summit मध्ये अनेक दिग्गज आपले अनुभव सांगत आहेत. नेटफ्लिक्सचे सह-CEO टेड सारॅन्डोस यांना ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ (WAVES) च्या पहिल्या पर्वात सहभागी होता आलं. ‘Streaming the New India: Culture, Connectivity and Creative Capital’ या चर्चासत्राचं सूत्रसंचालन खुद्द सैफ अली खान यांनी केलं.

या सत्रात टेड सारॅन्डोस यांनी सैफ अली खान यांना विचारलं, “तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मबद्दल सर्वात जास्त काय आवडतं?” त्यावर सैफनं दिलेलं उत्तर होतं –

“भारतात कथांचं एक अमूल्य खजिनाच आहे – महाभारत, रामायणसारख्या अद्भुत कथा, पंचतंत्र, लोककथा… काही कथा अशा आहेत ज्या अजून पूर्णपणे सांगितल्याच नाहीत. ह्या कथा जर आपण मांडल्या, तर जग त्यातून खूप काही शिकू शकेल. आणि OTT हा त्या साठी सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे.”

सैफ अली खान नेटफ्लिक्सवरील पहिल्या भारतीय ओरिजिनल सिरीज ‘Sacred Games’ मध्ये दिसले होते. अलीकडेच त्यांनी नेटफ्लिक्सच्या ‘Jewel Thief’ या हेस्ट चित्रपटात मुख्य भूमिका केली.

OTT प्लॅटफॉर्मबद्दल आपला अनुभव शेअर करताना ते म्हणाले, “याआधी आम्हाला एक ठरावीक साच्यात काम करावं लागायचं. पण आता OTT मुळे आम्ही पात्रांवर अधिक खोलात जाऊ शकतो, विविध शैलीत काम करू शकतो.”

“ही एक अतिशय वैयक्तिक आणि विचार करायला लावणारी, अनुभव देणारी माध्यम आहे. दोन तासांत गोष्ट संपवावी लागत नाही – कथेला तिच्या गतीने पुढे जाऊ देता येतं. मला एक कलाकार म्हणून हे खूप समृद्ध करतं,” अस सैफनं सांगितलं.

Spread the love

Related posts

Baaghi 4 FIRST Song ‘Guzaara’ Out! Tiger Shroff & Harnaaz Sandhu Bring Love And Heartbreak To Life

Sholay 50 years : Dharmendra’s Salary Will Leave You Speechless – Here’s What Every Star Earned

Ajay Devgn Returns to Comedy with ‘Son of Sardaar 2’, Set for July 25 Release

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More