गेली २६ वर्ष झी मराठीने महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात, अगदी घराघरात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. ‘मी मराठी झी मराठी’ हे केवळ वाक्य नव्हतं, तर मराठी माणसाच्या ओळखीचा एक अभिमान होता. आजही तो अभिमान जपताना, झी मराठी घेऊन आली आहे एक नवं रूप आणि त्याच भावनांचा नव्यानं साज – ‘सदैव तुमची झी मराठी’.
या एका ओळीत खूप काही सामावलं आहे – आपुलकी, नात्यांची वीण, आणि दिवसेंदिवस घट्ट होत चाललेला प्रेक्षकांशीचा संबंध. “सदैव तुमची” ही भावना केवळ घोषवाक्य नसून, ती एक नितळ, ओळखीची, आणि मनाला भिडणारी भावना आहे – जी झी मराठीच्या प्रत्येक कार्यक्रमातून प्रकट होते.
आपल्या संस्कृतीतलं, जगण्यातलं, आणि नात्यांमधलं जे काही खरंखुरं आहे, त्याला झी मराठी सिनेमॅटिक रूपात मांडते – हाच तिचा खरा गाभा आहे.
या संपूर्ण मोहिमेबाबत झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव म्हणाले, “आपका अपना झी” ही एक प्रभावी आणि हृदयाला स्पर्श करणारी मोहीम आहे. या अंतर्गत तयार करण्यात आलेली बहुभाषिक ब्रँड फिल्म सिरीज भारताच्या विविध भागांचा जिवंत अनुभव देते. ही मालिका दाखवते की आपल्या देशातील लोक किती आपुलकीने, प्रेमाने आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.
या मोहिमेतील सातही फिल्म्स त्या-त्या प्रांतांच्या संस्कृतीशी घट्ट जोडलेल्या आहेत. तिथल्या चाल-रूढी, निसर्ग, परंपरा आणि माणसांचा आत्मा उलगडण्यात आला आहे. केरळमध्ये पावसालाच एक पात्र मानून दाखवलं आहे, तर तेलंगणामधल्या एका गावातील सैन्य परंपरेची हृदयस्पर्शी कहाणी समोर आणली आहे. प्रत्येक कथा भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला आणि त्यामागच्या भावनिक नात्यांना अधोरेखित करते.
ही मोहीम प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्यात झी कसा एक आपुलकीचा, विश्वासाचा आणि भावनिक नात्यांनी जोडलेला भाग आहे, हे पुन्हा एकदा सांगते. ‘साथ हैं तो बात हैं’ ही भावना लाखो घरांच्या मनाशी इतकी जोडली गेली आहे, की झी हा फक्त एक चॅनल न राहता, घराचा हक्काचा सदस्यच बनला आहे — ज्याचं दररोज नव्याने स्वागत केलं जातं.”
यासंदर्भात झी मराठीच्या चीफ चॅनेल ऑफिसर व्ही. आर. हेमा म्हणतात,
“‘सदैव तुमची झी मराठी’ हे केवळ वाक्य नाही, तर आपल्या प्रेक्षकांशी असलेल्या भावनिक नात्याची अनुभूती आहे. ही वाहिनी म्हणजे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, तर घरातली एक आपुलकीची सवय बनली आहे. आता हे नातं नव्या स्वरूपात साकारत आहोत – नव्या मालिकांसोबत, नव्या अंदाजात.”
या नव्या प्रवासात झी मराठीने काही नवीन कार्यक्रमांची घोषणा केली आहे. नुकतीच सुरु झालेली ‘देवमाणूस’, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणारी ‘कमळी’ ही मालिका, आणि प्रेक्षकांची अत्यंत आवडती हास्ययात्रा ‘चला हवा येऊ द्या’ पुन्हा एकदा नव्या जोशात रंगणार आहे. याशिवाय, या वर्षभरात अनेक नव्या सरप्राइझेस झी मराठीकडून प्रेक्षकांसाठी येणार आहेत.
आज झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर ती दैनंदिन जीवनातली एक भावना बनली आहे. ती पाहिली जाते, अनुभवली जाते आणि घरातलीच एक सदस्य वाटते.
“या नव्या प्रवासातही तुमचं पाठबळ आमचं खरं बळ आहे. आणि म्हणूनच… ‘सदैव तुमची मी मराठी झी मराठी’!”