सातव्या मुलीची सातवी मुलगी! पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत सापडणार का विरोचकाचे रहस्य?

झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका कमालीची गाजत आहे. अतिशय रहस्यमयी असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. खूपच वेगळा विषय असल्याने मालिका बघताना देखील सगळ्यांनाच मजा येत आहे. मालिकेत येणारे विविध उत्कंठावर्धक वळणं प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवत असल्याने मालिका लोकप्रियतेच्या बाबतीत टॉपवर आहे.

पद्माकर राजाध्यक्ष यांच्या रहस्यमयी मृत्यूनंतर आता सध्या मालिकेमध्ये पंचपिटिकेचे रहस्य उलगडण्याचा ट्रॅक सुरु आहे. मालिकेत आतापर्यंत अनेक वळणं आली आणि यातून विविध आश्चर्यकारक गोष्टी उघड झाल्या. आता या पंचपिटिकेच्या रहस्याच्या बाबतीत देखील प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पेटीचे रश्या उघड झाल्यानंतर आता सगळ्यांनाच आतुरता आहे, ती तिसऱ्या पेटीची.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत पंचपिटिका रहस्यामध्ये तिसरी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल. तिसरी पेटी नेत्राची आहे का ती अव्दैतची असेल हे रहस्य या येणाऱ्या आठवड्यात समोर येईल. प्रत्येक पेटीमध्ये पिंपळाच्या पानावर काहीतरी कोडे लिहिलेले मिळत आहे. त्यामुळे तिसऱ्या पेटीमध्ये पानावर लिहिलेले कोडे आणि रहस्य खूपच रंजक असणार आहे.

या तिसऱ्या पेटीमध्ये जे कोडे असेल ते सर्पलिपी मध्ये लिहिलेले असणार आहे. त्यामुळे ते नक्की वाचायचे कसे? कोण वाचणार? त्यातून आता कोणते नवीन आव्हान समोर येणार हे पाहणे आसूक्त्याचे असणार आहे. या तिसऱ्या पेटीमध्ये विरोचक कोण आहे, हे ही रहस्य उलगडण्याचा शक्यता असू शकते. इंद्राणी आता नेत्राचे रक्षण कसे करणार? जेव्हा रुपाली समोर विरोचकाचे नाव येईल तेव्हा काय होईल? पानावरच्या रहस्यामध्ये असे काय लिहलेले आढळणार जे वाचून नेत्रा आणि अद्वैतच्या पायाखालची जमीन? या पेटीमुळे त्या दोघांच्या नात्यामध्ये बदल होणार का? पेटी मधल्या मजकूरावर लिहलेली सर्पलिपी वाचायला कोण करेल त्यांची मदत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर मालिकेत या आठवड्यात मिळणार आहे. त्यामुळे मालिकेला एक वेगळेच आणि रंजक वळण मिळणार हे नक्की. मग सर्व रहस्यांचा उत्तरांसाठी पाहत राहा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. फक्त झी मराठीवर.

Spread the love

Related posts

या आठवड्यात ओटीटीवर धमाका! ‘पंचायत सीझन ४’ ते ‘रेड २’ पर्यंत काय पाहणार आहात? जाणून घ्या सविस्तर

WavesSummit : मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

बंजारा ठरला सिक्कीममध्ये चित्रीत होणारा पहिला भारतीय चित्रपट

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More