मनोरंजनाचा महासंगम! झी मराठीवर सुरु होत आहे कधी न पाहिलेला असा महासंगम

एखाद्या चॅनेलच्या गाजलेल्या मालिकांमधील कलाकारांना त्याच चॅनेलच्या दुसऱ्या मालिकांमध्ये सर्रास पाहिले जाते. काही खास कारणांसाठी, मालिकेला वेगळे वळण देण्यासाठी किंवा प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी असे ट्रॅक आपण नेहमीच बघतो. मालिकेत दुसऱ्या मालिकेतील कलाकार येणे हे बहुतकरून हिंदीमध्ये होत असले तरी याला मराठी मालिका अपवाद नाही. कधी कधी तर ‘महासंगम’ म्हणत दोन मालिका एकत्र देखील दाखवल्या जातात.

असाच एक मोठा महासंगम लवकरच झी मराठीच्या दोन तुफान लोकप्रिय मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोन मालिका म्हणजे ‘सारं काही तिच्यासाठी’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. एकीकडे उमाची होणारी तारेवरची कसरत तर दुसरीकडे अक्षराच्या मनात होणारी घालमेल. अशा तुम्हाला आवडणाऱ्या या दोघींच्या विभिन्न विश्वाचा होत आहे सुरेख मेळ. ‘सारं काही तिच्यासाठी’ आणि ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. ह्या दोन्ही मालिकांचा कधी न पाहिलेला असा महासंगम आजपासून अर्थात २० नोव्हेंबरपासून ते २५ नोव्हेंबरपर्यंत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

अक्षरा आणि उमाची काय असणार नवी कसोटी? भुवनेश्वरीचे कसे असणार पुढचे डावपेच? कोण देणार आहे त्यांची साथ? उमाची समजुदारी, अनुभव आणि अक्षराची बुद्धिमत्ता हे त्यांना येणाऱ्या आव्हानांना सामोरी जाण्यासाठी कशी मदत करणार हे तुम्हाला या महासंगममध्ये पाहायला मिळणार आहे. सोबतच निशी आणि ओवीच्या जीवनात येणारे एक नवीन वळण, इरा आणि निखिल यांच्या आयुष्यात येणारे वादळ आदी अनेक रंजक बाबींसोबतच उमा आणि अक्षराच्या आयुष्यात हा महासंगम खूप काही नवीन वळणे आणणार आहे.

आता ह्या ब्लॉकबस्टर महासंगम विशेष भागात नक्की काय होणार ह्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल. तेव्हा पाहायला विसरू नका मनोरंजनाचा महासंगम २० ते २५ नोव्हेंबर संध्या. ७.३० ते ८.३० फक्त आपल्या झी मराठीवर.

Spread the love

Related posts

आदर्श सून साकारत मिळवली लोकप्रियता, अभिनयसोबतच राजकारणात देखील तयार केली ओळख जाणून घ्या स्मृती ईराणी यांचा प्रवास

सईच्या घरी आली नवी पाहुणी! नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डंकी सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणे प्रदर्शित, सोनू निगमच्या आवाजातून जाणवते देशाबद्दलची तडफड

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More