आजपर्यंत आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक बायोपिक पाहिले आहेत. कर्तृत्वान आणि दिग्गज लोकांच्या या बायोपिक पडद्यावर बघताना प्रेक्षकांना देखील खूपच मजा येते. मात्र आता या बायोपिकच्या गर्दीमध्ये एका बायोपिकची खूपच जास्त चर्चा असून, त्या बायोपिकची प्रेक्षकांना तर उत्सुकता आहे सोबतच विविध क्षेत्रातील मोठ्या लोकांना देखील आहेच. ही बायोपिक आहे, भारताचे दिवंगत पूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी बाजपेयी. एक उत्तम राजनेता असण्यासोबतच ते उत्तम कवी होते. त्यांनी भारताच्या विकासासाठी स्वतःला झोकून देत कार्य केले. अतिशय मोठ्या कष्टाने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘मैं अटल हूं’ नावाचा एक सिनेमा येत आहे. नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान अभिनेते म्हणून ओळखले जाणारे पंकज त्रिपाठी या बायोपिकमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. आता ते अतिशय दिग्गज व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांना पंकज यांना या भूमिकेत पाहण्याची खूपच आतुरता निर्माण झाली आहे. या सिनेमाशी संबंधित एक खूपच महत्वाची बातमी समोर आली आहे.
पंकज त्रिपाठी यांनी या सिनेमाचे एक पोस्टर शेअर करत प्रेक्षकांना सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. अटल बिहारी वाजपेयी हे अतिशय ताकदवर, हुशार, प्रतिभावान, लोकप्रिय, कणखर नेते होते. ते तीन वेळेस भारतचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले होते. आता ‘मैं अटल हूं’ या सिनेमातून अटल बिहारी वाजपेयी यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. नुकतेच पंकज यांनी या सिनेमाचे चार नवीन पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली.
पंकज त्रिपाठी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “हार्ट ऑफ गोल्ड… मॅन ऑफ स्टील… एक बहुमुखी कवि… नवीन भारताच्या मागील दूरदर्शी, श्री अटल बिहारी वाजपेयी यांची कथा #MainATALHoon चे साक्षीदार व्हा 19 जानेवारी 2024 ला चित्रपटगृहांमध्ये.”
या सिनेमासाठी पंकज त्रिपाठी यांचे ट्रांसफॉर्मेशन पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटत आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या रवी जाधवने दिग्दर्शित केले आहे.