सासू-सुनेची जोडी ही मालिकाविश्वातील आजवरची सर्वात हीट जोडी आहे. या दोघांमधले प्रेम, राग, चिडचिड, उणे-दुणे, वाद विवाद यांवर मालिकांनी हजारो एपिसोड बनवले आहेत. पण सासू-सुनेच्या या जोडीचा ट्रेण्ड सध्या बदलताना दिसत आहे. या जोडीची जागा आता सासरे-सून यांची जोडीने घेतली आहेत. सासरेबुवा आणि सुनबाई ही जोडी मालिकाविश्वात हीट ठरत आहे. याआधी ‘अग्गबाई सासूबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठ’, ‘माझ्या नव-याची बायको’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकांमध्ये आपण सुनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेले, सुनेला मुलीप्रमाणे माया लावणारे सासरे पाहिले आहेत. जुन्या काही मालिकांमध्ये सासरे या व्यक्तिरेखेला एकतर नगण्य महत्त्व असायचे किंवा एकतर ते सासूच्या मुठीत असलेला नवरा म्हणून दिसायचे. तर कधीकधी काही मालिकांमध्ये सासरे खुप शिस्तप्रिय, कडक स्वभावाचे म्हणून समोर यायचे. घरात सगळ्यांवर त्यांचा धाक असायचा. सासरेबुवांचा हा चेहरा आता बदलताना दिसत आहे. प्रेमळ, मनमोकळ्या स्वभावाचे, सूनेला समजून घेणारे असे सासरे सध्या मालिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. या मालिकांमधली सासरे-सुनेची नातं प्रेक्षकांना चांगलं भावलं आहे. सध्या सुरु असलेल्या काही मालिकांमधल्या अशाच सासरे सुनेच्या हीट जोडी पहा.
‘तू चाल पुढं’ या मालिकेत अश्विनीला कायम आदित्य आणि शिल्पीमुळे त्रास सहन करावा लागतो. पण अशावेळीही अश्विनीचे सासरे प्रकाश वाघमारे हे स्वतच्या मुलाची किंवा मुलीची बाजू न घेता सूनेची बाजे घेताना दिसतात.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अप्पा कायमच अरुंधतीच्या पाठिशी उभे राहिले आहे. अगदी तिच्या दुसऱ्या लग्नातदेखील अप्पांनी वडिल बनून तिचे कन्यादान केले.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत ललित इनामदार यांनी कायम आपली सून दीपाला पाठिंबा दिला. स्वतसाठी कधीही नाही बोलणारे ललित इनामदार यांनी दीपाच्या पाठिशी उभं राहत अनेकदा आपल्या बायकोला म्हणजेच सौद्या इनामदारला तर कधी आपल्या मुलाला कार्तिकला कडक शब्दांत समज दिली आहे.
‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत अप्पू ही घरात सगळ्यांची खूप लाडकी आहे. तिचे सख्खे सांसरे विठ्ठल कानिटकरांचे प्रेम तिला मिळतेच. सोबतच चुलत सासरे विनायक कानिटकर आणि कुकी म्हणजेच विकास कानिटकरांचे देखील तिच्यावर खूप प्रेम आहे. कुकी आणि अप्पू तर बेस्ट फ्रेण्ड सारखे राहतात.
‘स्वाभिमान’ या मालिकेत प्रभाकर सूर्यवंशी भलेही आपल्या व्ययक्तिक आयुष्यात आपल्या पत्नीसाठी उभे राहू शकले नाहीत पण सून पल्लवीची बाजू अनेकदा मांडली आहे. ते पल्लवीवर पोटच्या मुला इतकेच प्रेम करताना दिसतात.
‘जीव माझा गुंतला’मधील आजोबा खरेतर अंतराचे आजेसासरे पण मालिकेत ते आपली सून सुहासिनी आणि नातसून अंतराच्या पाठिशी कायम उभे राहिलेले पाहायला मिळतात. यावेळी आपला मुलगा सुधाकर याला ही अनेकदा खडेबोल सुनावताना दिसतात.
तर मग तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या वेबसाईटला लाईक,शेअर आणि फॉलो करा.