या आठवड्यात ओटीटीवर धमाका! ‘पंचायत सीझन ४’ ते ‘रेड २’ पर्यंत काय पाहणार आहात? जाणून घ्या सविस्तर

OTT Releases This Week : या आठवड्यात ओटीटीवर भरपूर मनोरंजन होणार आहे. २२ जून ते ३० जून दरम्यान नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम आणि हॉटस्टार यांसारख्या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते धमाकेदार कंटेंट यंदा पाहायला मिळणार आहेत!

👉 हेड ओव्हर हिल्स

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर सुरू झाला आहे, आणि तो प्रेक्षकांची मनं जिंकतोय. पण ज्यांना काहीतरी वेगळं आणि भन्नाट विनोद पाहायचा आहे, त्यांच्यासाठी ‘हेड ओव्हर हिल्स’ हा नवा शो २३ जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होत आहे. या शोची क्रेझ आधीपासूनच आहे आणि प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

👉 पंचायत सीझन ४

फुलेरा गावातील प्रत्येक पात्र आता प्रत्येक घराचं एक अविभाज्य भाग बनलं आहे. ‘पंचायत’ ही मालिका आपल्या साधेपणामुळे आणि सच्चेपणामुळे प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली आहे. त्यामुळेच मागील सीझन संपताच प्रेक्षकांनी चौथ्या भागासाठी उत्सुकता दाखवली होती. अखेर, २४ जून रोजी ‘पंचायत सीझन ४’ अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

👉 काउंटडाऊन

थ्रिलर आणि अ‍ॅक्शनप्रेमींसाठी खास मेजवानी! ‘काउंटडाऊन’ या नवीन वेब सीरिजचा पहिला सीझन २५ जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे. विशेष टास्क फोर्सवर आधारित ही कथा प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवेल, अशी अपेक्षा आहे.

👉 आयर्न हार्ट

सुपरहीरो प्रेमींना आनंदाची बातमी! ‘आयर्न हार्ट’ २५ जून रोजी जिओ हॉटस्टारवर प्रीमियर होणार आहे. मार्वल युनिव्हर्सशी संबंधित ही मालिका केवळ मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही जबरदस्त आवडणारी ठरेल. या शोची प्रतीक्षा मार्वलच्या चाहत्यांनी फार दिवसांपासून केली आहे.

👉 रेड-२

जर अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्यातील ती जबरदस्त टक्कर चित्रपटगृहात मिस झाली असेल, तर चिंता नको. २७ जून रोजी ‘रेड-२’ नेटफ्लिक्सवर प्रीमियर होणार आहे. क्राईम आणि सस्पेन्सचा परफेक्ट डोस असलेला हा चित्रपट पुन्हा पाहण्याची संधी दवडू नका.

👉 स्क्विड गेम सीझन ३

नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक चर्चेत राहिलेला ‘स्क्विड गेम’ आता आपल्या अंतिम टप्प्यात आहे. या कोरियन थ्रिलरचा संभाव्य शेवटचा सीझन – ‘स्क्विड गेम सीझन ३’ – २७ जूनपासून नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. या शोने जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली असून शेवट काय होतो हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Spread the love

Related posts

OTT Release In June : जूनमध्ये ओटीटीवर धमाका! ‘स्क्विड गेम 3’ पासून ‘राणा नायडू 2’ पर्यंत, पाहा संपूर्ण यादी

भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा गाजलेला सिनेमा आता ओटीटीवर; एक हृदयस्पर्शी कथा आता घरबसल्या अनुभवता येणार

WavesSummit : मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More